सुरेश मिसाळ- महान्यूज लाईव्ह
बारामती : न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या सर्वांनी आपण महापुरूषांची कामे पुढं नेत आहोत या भावनेतून कामं करावीत अशी भावना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती संजय देशमुख य़ांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, डा. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी समाजोध्दारासाठी खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांचे महान कार्य आपल्याला पुढे सुरू ठेवायचे आहे. वकिल तसेच न्यायिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनीच ताण व्यवस्थापन करताना आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
त्याकरिता युक्त आहार विहार व व्यायाम, योगा इत्यादीतून शऱीर व मन कणखर बनवावे. शरीर मजबूत राहिल्यासच चांगले काम करता येईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामती बार असोशिएशनच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देताना ते शनिवारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश जे.एल. गांधी होते.
यावेळी बारामती बार असोशिएशनचे अध्यक्ष अँड. बी.डी. कोकरे, इंदापुर बार असोशिएशनचे अँड सुभाष भोंग, फलटण बार असोशिएशन अँड सागर सस्ते, श्रीगोंदा बार असोशिएशनचे अँड मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश आर. के. देशपांडे, जे. ए. शेख, के. एस. बाकरे, एस. एस. पल्लोड, एस. बी. राठोड, ए. एम. जोशी, एस. टी. चिकणे, ए. ए. शहापुरे, एन. आर. वानखेडे, ए. आर. मरछिया, डी. टी. जाधव, व्ही. व्ही. पाटील, पी. ए. आपटे, एन. व्ही. रणवीर, ए.जे. गिर्हे, श्री. कलाल आदी न्यायाधीश उपस्थित होते. बारामती, दौंड, इंदापूर, श्रीगोंदा, फलटण भागातून वकिल उपस्थित होते.