दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई – समाजातील दानशुर व्यक्तींनी एकत्र यावे, वंचितांचे, निराधारांचे आश्रयदाते व्हावे ही तर खरी आपल्या धर्माची, समाजाची शिकवण.. म्हणूनच जे लोक घरदार, नातेवाईक सोडून किंवा मानसिक त्रासाने घराबाहेर पडलेले आहेत, अशांना आधार देण्याचे काम केले पाहिजे. रवी बोडके यांनी यशोधन ट्रस्टच्या माध्यमातून हे काम केलेच आहे, त्यांना अॅड. प्रशांत खरे यांच्यासारख्या दानशूरांनी पुढे येऊन केलेले सहकार्य मोलाचेच मानावे लागेल.
पुणे सातारा किंवा सातारा पुणे या महामार्गावर वेडसर परिस्थितीत सर्व नागरीक उघड्या डोळ्यांनी पाहतात, पण दुर्दैवाने त्यांची दुर्गंधी येत असल्याने समाज त्यांना आपल्या कळपात समावुन घेत नसल्याने ते निराधार सारखे आपले आयुष्य जगताना आपण पाहतो.
अशा वेडसर, निराधार लोकांना एकत्र करण्याचे काम यशोधन निराधार आश्रमाचे संस्थापक रवी बोडके हे समाज सहभागातून करत आहेत. या संस्थेतील निराधार लोकांना भुईंज येथील वकील प्रशांत खरे यांनी उबदार ब्लँकेट दिली. ही मदत लाखमोलाची असल्याचे मत वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी व्यक्त केले..
सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये अनाथ, बेघर, निराधार लोकांची सेवा करणारी एक संस्था वेळे (ता. वाई) या ठिकाणी आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार लोकांना मदत करुन रस्त्यावरुन उचलून आश्रमात आणले जाते व त्यांचा सांभाळ केला जातो. गरजेप्रमाणे उपचारही केले जातात व घर शोधून परत त्यांना त्यांच्या घरी अथवा नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाते.
रवि बोडके व त्यांचे सहकारी हे पुण्यकर्म अहोरात्र करीत आहेत. संत गाडगेबाबांनी सांगितल्याप्रमाणे देव दगडात पाहु नका, तर देव माणसात पहा हे सत्यात उतरवून मानव सेवा हिच ईश्वर सेवा मनाशी बाळगून यशोधन आश्रमात लोकांची सेवा केली जाते. संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नसून संस्था लोकसहभागावर चालते. लोक मदत करुन सेवा करत असतात.
या संस्थेची गरज लक्षात घेऊन प्रशांत खरे यांनी
वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या हस्ते ही मदत केली. यावेळी विजय शिर्के, किरण निंबाळकर, अमोल गोळे, प्रसाद दुदुस्कर, राहुल तांबाळी, प्रशांत जाधवराव, गजानन जाधव आदी उपस्थित होते. वाई पोलिस ठाण्याच्या आवारात ही ब्लॅंकेट भरणे यांनी रवी बोडके यांच्याकडे सूपूर्त केली.