दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई – येथील ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री कृष्णामाई उत्सवास ढोलताशांच्या गजरात उत्साहात सुरुवात झाली. श्री कृष्णाबाई उत्सवास ३५० वर्षापूर्वींची परंपरा आहे. हा उत्सव सात घाटांवर पुढील दिड महिना सुरु राहणार आहे.
या उत्सवाची सुरुवात भीमकुंड आळीतील उत्सवाने झाली. श्री कृष्णामाई उत्सवामध्ये धार्मिक, सांस्कृतिक कार्यकमांचे आयोजन करण्यात येते. प्रारंभी उदकशांतीने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर कृष्णातीरावरून धार्मिक विधीने पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
भीमकुंड येथील उत्सवामध्ये सोमवार, दि. २३ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ४ वा. मंत्रजागर, ४ ते ५ वा. मैत्रेयी ग्रुपचे श्रीसूक्त पठण, सायं. ५ ते महिला मंडळ, वाई यांचा मंत्रजागर, मुरलीधर भजनी मंडळ यांचे भजन, रात्री ९.३० वा. श्री क्षेत्र पंढरपूरचे ह.भ.प. निरंजन महाराज मनमाडकर यांचे श्री कृष्णा महात्म्य हा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ वा. चित्रकला स्पर्धा, सकाळी ११ ते १२.० वा. बक्षीस समारंभ, दुपारी ४ ते गार्गी भजन मंडळ यांचे भजन, विरशै महिला मंडळाचे श्रीसूक्त पठण, रात्री ९.३० वा. सौ. गौरी वायचळ-वनारसे यांचे संबळ वादन, रात्री १०.३० वा. पुणे येथील अथर्व ज्ञानेश्वर बोत्रे यांचे बासरी वादन.
बुधवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ३ महाप्रसाद, रात्री ९.३० वा. मुंबई येथील मैथिली बापट व कौशिकी अजय जोगळेकर यांचे गायन, गुरुवार दि. २६ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ५ वा. गंगापुरी येथील कृष्णाई भजनी मंडळ यांचे भजन, सायं. ५ ते ७ वा. संस्थानचे हळदी कुंकू व साडी लिलाव, रात्री ९.३० वा. श्री कौस्तुभ वैद्य यांचे लळीताचे किर्तन होईल.
दरम्यान यानंतर रोज सकाळी ५.३० वा. लाखानगर येथील माऊली मंडळ यांची काकड आरती, सायंकाळी ७ वा. आरती, मंत्रपुष्पांजली व श्री विष्णूसकस्त्रनाम पठण होईल. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सरपंच प्रसाद कुलकर्णी, उमेश रास्ते, प्रशांत कुलकर्णी, नरेंद्र महाजन, स्वरुप मुळे, सुधाकर भिलारे, संदीप जोशी, गौरव देशपांडे, सौरभ ताटके, प्रभाकर जोशी यांनी केले आहे.
मधलीआळी (ता.२६ जानेवारी), धर्मपुरी ( ता. ३१ जानेवारी), गणपती आळी ( ता. ६ फेब्रुवारी), ब्राम्हणशाही (ता.१२ फेब्रुवारी), रामडोहआळी (ता. २१ फेब्रुवारी), गंगापुरी (२५ फेब्रुवारी) या घाटावर श्री. कृष्णामाई उत्सव होणार आहेत.