कृषी विकास प्रतिष्ठानचं एक उच्च दर्जाच प्रदर्शन, प्रतिसादही चांगला
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती मध्ये कृषी विकास प्रतिष्ठानच्या शेतीतील नव -नवीन प्रात्यक्षिके व नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली.आणि यानंतर पवार यांनी सायन्स पार्कमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी शरद पवार यांनी कृषी विकास प्रतिष्ठान मध्ये काही ना काही तरी नवीन उपक्रम या ठिकाणी घेतले जातात.राजेंद्र पवारांनी या कामाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी हे काम अधिक मोठ्या प्रमाणावर कसं करता येईल. त्याकडे बारकाईने लक्ष दिले. ते आणि त्यांची सगळी टीम यांनी अतिशय मेहनत करून एक उच्च दर्जाचे प्रदर्शन आयोजित केले आहे.
असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बारामती येथील कृषी प्रदर्शनावेळी व्यक्त केले.
आज या ठिकाणी जे लोक प्रदर्शन पाहण्यासाठी येतात. यामध्ये आपण जर पाहिलं तर ८० टक्के लोक हे तरुण होते. नवी पिढी होती आणि नवीन पिढीमध्ये या टेक्नॉलॉजी संबंधीची आस्था ही दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्याच एक उत्तम लक्षण या ठिकाणच्या उपस्थितीच्या माध्यमातून आपल्याला कळलेल आहे.
म्हणून हा जो कार्यक्रम कृषी विकास प्रतिष्ठानने गेली अनेक वर्ष घेतला. तो अतिशय उत्तम आहे.त्याला प्रतिसाद ही चांगला आहे.आणि नुसता प्रतिसाद नाही, तर या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग तो शेतकरी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये उत्पादन वाढीसाठी करत आहे ही अत्यंत जमेची बाजू आहे.
कृषी विकास प्रतिष्ठानच्या स्थापनेच्या काळात आमच्या मनामध्ये एक धारणा होती. की हे जे नवीन तंत्रज्ञान जगामध्ये देशांमध्ये येतंय, ते तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि ते पोचवत असताना भाषण देऊन लेक्चर देऊन पोहचवण्याऐवजी प्रत्यक्षपणे त्या तंत्रज्ञानाचा वापर फिल्डवर करून त्याची उपयुक्तता किती आहे. हा विचार मांडलेला होता. आणि तो विचार गेली काही वर्ष अतिशय चांगल्या रीतीने कृतीमध्ये आलेला दिसतोय. असे पवार म्हणाले.
कृषी प्रदर्शन पाहत असताना हजारो वयस्कर शेतकरी ज्यांना मी ओळखतो माझी आणि त्यांची बरीच वर्ष भेट नाही पण त्यांनाही कृषी प्रदर्शनाच औसूक्यय याचा मला आनंद आहे.
या प्रदर्शनामध्ये तरुणांची संख्या जशी मोठी आहे तशी वडीलधारी लोक सुद्धा आस्थेने जे काही नवीन बदल आहेत ते जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतात ही अत्यंत जमेची बाजू आहे असे पवार म्हणाले.
तसेच जगामध्ये भरड धान्यपिकाच्या संबंधीचा विचार करण्याची कल्पना मान्य झाली आणि यंदाच वर्ष सगळ्या विश्वाने भरडधान्य संबंधी साजरे करावे आणि ते साजर करत असताना त्याचा प्रसार करावा. आज कृषी विकास प्रतिष्ठानने विविध दालन उभारली आहेत. त्यामध्ये भरड धान्यासंबंधी आस्था वाढेल आणि त्यासाठी विविध प्रकारची बियाणे उपलब्ध राहतील. या दृष्टीने एक दालन स्वतंत्र उभारले आहे.आणि त्याचा उपयोग शेतकरी करून घेतील याची मला खात्री आहे असे पवार म्हणाले.