दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा डिकसळ (ता. इंदापूर) येथील जुना पुल आता १५० वर्षाचा झाला असून या ब्रिटिशकालीन पुलाच्या एका मोरीचे दगड ढासळू लागले आहेत. हा पूल अखेरची घटका मोजत आहे, त्यामुळे शासनाने या पुलावरून वाहतूक करणाऱ्या उंच व जड वाहनांना बंदी घातली आहे.
डिकसळ येथील पुलावरून अवजड वाहनांवर वाहतुकीसाठी शासनाने घातलेली बंदी ही गेल्या १६ वर्षांपासून कागदावरच राहिली. या पुलावरून जड वाहतूक बंद व्हावी यासाठी प्रशासनाने दोन्ही बाजूंना मोठमोठे लोखंडी बॅरॅकेट्स लावून वाहतूक बंद केली, मात्र त्यानंतरही या पुलावरून धोकादायक रित्या वाहतूक सुरू आहे. या ब्रिटिशकालीन पुलाचे मध्यभागी असणारे मोरीचे आधाराचे दगड ढासळू लागले आहेत. यामुळे भागातील रोज दैनंदिन होणारी दळणवळण व्यवस्था बंद करण्याशिवाय आता पर्याय राहिला नाही.
या पुलावरून वाहने जात असताना पुलाचे निसटलेल्या दगडाखालील माती ढासळू लागली आहे. एखादे जर मोठे अवजड वाहन किंवा शाळेची बस यावरून जात असताना अनुचित प्रकार घडला तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डिक्सळ येथील पुलाचे बांधकाम सन १८५५ साली करण्यात आले होते. गेली ४७ वर्षे हा पूल पाण्याखाली आहे. पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील पुनर्वसित गावे कोंढार चिंचोली (ता.करमाळा) व डिकसळ(ता.इंदापूर) यांना जोडणारा भीमा नदीवरील हा पूल एकमेव दुवा म्हणून काम करीत आहे.
दरम्यान, उजनी धरणाच्या पुनर्वसनानंतर रेल्वेमार्गावर रस्ते वाहतुकीसाठी मार्ग म्हणून हा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. गेल्या चार- पाच वर्षांपूर्वी कोकणातील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली होती, त्यावेळी प्राचीन ब्रिटिशकालीन पूल म्हणून याही पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते व ‘हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे , अशा सूचना डिकसळ पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आल्या होत्या.
पण प्रशासनाने लावलेल्या या सुचनाकडे साफ दुर्लक्ष करून त्यावरून अवजड वाहतूक केल्यामुळे पुलाला आपल्या अखेरच्या घटका मोजण्याची वेळ आली आहे.
हा डिकसळ पुल जुना झालेने या ठिकाणचा मोठा धोका लक्षात घेऊन या भागातील नागरिकांची सोय करण्यासाठी मागील सरकारने ५५ कोटीचा निधी हि मंजूर केला आहे, मात्र नवीन सरकार आल्यानंतर या निधीला स्थगिती देण्यात आली आहे,मात्र आता नवीन मंजुरी देण्यात आली असल्याचे या भागातील नेते मंडळी बोलत आहेत,
या पुलामुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ३० ते ४० गावांचा संपर्क पुणे जिल्ह्याशी जोडला जात असल्याने या भागातील नागरिकांना रुग्णसेवा व अत्यावश्यक सेवा तातडीने मिळ्त आहेत. हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यास या भागातून येणाऱ्या नागरिकांना राशीन मार्गे ५० किमी लाबून यावे लागणार आहे,या पुलाचा काही भाग निखळू लागल्याने तो कधीही ढासळू शकतो अशी धोकादायक परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.