दौंड : महान्यूज लाईव्ह
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. तर दौंड पोलीस ठाण्यात प्रभारी असलेले भाऊसाहेब पाटील यांनाच दौंड पोलीस ठाण्यातच फेरनियुक्ती करण्यात आली असून पुढील पदभार देण्यात आला आहे.
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी बदलीचे हे परिपत्रक काढले आहे. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण विनायक पवार यांची बदली जुन्नर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नारायण पवार यांनी दौंड पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला होता. मात्र यवत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी दौंड पोलीस ठाण्याचा पदभार काढून यवत पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक पवार यांनी दौंड व यवत पोलीस ठाण्यात अत्यंत चांगल्या प्रकारे कामकाज केले आहे. दौंड व यवत पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करत त्यांच्यावर लगाम बसवला होता. चोरी, खून आदी गंभीर गुन्ह्यातील तपास करुन आरोपींना जेरबंद करण्याचे मोठी कामगिरी केली होती. तसेच बेकायदा गुटखा वाहतूक करणारे वाहने, जिल्ह्यात सक्रिय झालेले रोहित्र चोरांची टोळी, बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणारी टोळी जेरबंद करण्याची महत्व पुर्ण कामगिरी त्यांनी केली होती.
पवार हे यांच्या चांगल्या कामगिरीमुळे अल्पवधीतच दौंड व यवत पोलीस ठाण्यात लोकप्रिय ठरले होते. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी (दि.१९) जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे परिपत्रक काढले, यामध्ये यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत गणपत शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दौंड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मात्र आता भाऊसाहेब पाटील यांनाच दौंड पोलीस पोलीस ठाण्याचा पुढील पदभार देण्यात आला आहे.