शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील राजकारणात नेहमी धांदल उडवून देणारे माजी जिल्हा परिषद सभापती मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर झाल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर असे की, माजी जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल हे गेल्या दीड वर्षांपासून फसवणूक व विविध गुन्ह्यांत अटकेत होते.
मंगलदास बांदल हे शिरूर तालुक्यातील राजकारणात सक्रिय नसल्याने राजकीय वातावरण थंड होते.मात्र मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर झाल्याने शिरूर तालुक्यातील राजकारणात पुन्हा ट्विस्ट येणार का ? बांदल पुन्हा धांदल उडवून देणार का ? याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान बांदल यांना जमीन मंजूर झाल्याचे कळताच अनेक समर्थकांनी व्हॉट्सॲप स्टेट्स बदलल्याचे दिसून येत आहे.