दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्याचा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नावलौकिक मिळवून मानाचा तुरा उंचवला गेला कारण, मळद गावच्या विद्यमान सरपंच ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या या परीक्षेमध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्यात पाचवे स्थान मिळवले आहे. मोहीनी भागवत या सध्या मळद ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ते न्यायाधीश अशी वाटचाल करणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे. शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन यश संपादन केल्याने नव्या पिढीपुढे विशेषतः ग्रामीण भागातील महिला, विद्यार्थ्यांपुढे त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मोहिनी भागवत यांचे पती ॲड बापूराव भागवत यांचीही त्यांना या कामी मोलाची साथ मिळाली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल दौंड तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.