बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांची बदनामी केल्याप्रकरणी एका वेब पोर्टलवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी बारामती तालुका पोलिसांकडे फिर्याद दिली असून आपला काही संबंध नसताना बातमीद्वारे आपली बदनामी करण्यात आल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे.
याप्रकरणी तालुका पोलिसांनी संबंधित पोर्टलच्या संपादक, कार्यकारी संपादक, क्राईम संपादकावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.