शिरूर – महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यात रांजणगाव,शिक्रापूर पोलिस पोलिस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणी झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असून पोलिसांनी आरोपी गजाआड केले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, शिरूर तालुक्यात बुरुंजवाडी येथे ३नोव्हेंबर रोजी, सोनेसांगवी येथे १५ डिसेंबर रोजी तर पिंपळे धुमाळ येथे ५ डिसेंबर रोजी, मुखई येथे २२ डिसेंबर रोजी असे एकूण चार दरोडे चोरट्यांनी टाकले होते. या प्रकरणी शिक्रापूर, रांजणगाव या पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिस आरोपीच्या शोधार्थ होते.
या घडलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती घेत सदर दरोडे वाडेगव्हाण व कोळगाव जिल्हा अहमदनगर येथील आरोपींनी केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी आदेश काळे, सचिन काळे (दोघेही रा. मोहोरवाडी, कोळगाव, ता. श्रीगोंदा) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी त्यांच्या फरार साथीदारांसह गुन्हे केले असल्याची कबुली दिली.
आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे तपासादरम्यान चोरीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेला फोन, लोखंडी कोयता, कटवणी, १ तोळ्याचे सोन्याचे शॉर्ट गंठण, अशा वस्तू आरोपींकडून जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी वाडेगव्हाण येथे तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी घर तयार केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, शिवाजी ननवरे, सहायक फौजदार तुषार पंदरे, मुकुंद कदम, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन,
मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, दीपक साबळे, सचिन घाडगे, विजय कांचन, असिफ शेख, अजित भुजबळ, धीरज जाधव, अक्षय नवले, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, पोलिस हवालदार अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, निखिल रबडे, किरण निकम, अपेक्षा तावरे, रांजणगाव पोलिस स्टेशनचे विनोद शिंदे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय शिंदे, उमेश कुतवळ, मोनिका वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.