दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
कवठेमहांकाळ पंचायत समिती प्रधानमंत्री आवास योजनेच्या महाआवास अभियानात जिल्हा स्तरावर प्रथम तर राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेत जिल्ह्यात दुसरी आली.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेत येथील पंचायत समितीने महाआवास अभियान अंतर्गत विविध उपक्रमात तालुक्याला प्रथम तर राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला.
जिल्हाधिकारी कार्यालयात हा महाआवास पुरस्कार पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, विस्तारधिकारी डी.आर.गुरव, डी.आर.शिंदे, लिपिक प्रवीण देसाई, गजानन चौगुले यांना सन्मानचिन्ह व प्रशिस्तपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आमदार सुमनताई पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, प्रकल्प संचालक दीपक चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोंखडेंसह मान्यवर उपस्थित होते.
राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेत जिल्हास्तरावर आगळगाव ग्रामपंचायतीने प्रथम, विठुरायचीवाडी ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळविला. या कार्यक्रमात संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना सन्मानचिन्ह व प्रशिस्तपत्र देऊन गौरविण्यात आले