दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
मुंबईहून आणलेल्या मजूरांच्या टेम्पोला महाबळेश्वर तालुक्यातील मूकदेव घाटात चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. टेम्पो उलटून दरीत कोसळला. त्यामध्ये 30 ते 40 मजूर होते, ते जखमी झाले आहेत.
गंभीर जखमी झालेल्या मजूरांना तातडीने उपचारासाठी सातारा येथील शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आले असून किरकोळ जखमी झालेल्या मजूरांना उपचारासाठी तळदेव रुग्णालय व महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.
सह्याद्री ट्रेकर्स च्या स्वयंसेवकांनी खोल दरीतून जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनीही बचाव कार्य केले. या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी येथे गर्दी केली.