शिर्डी: महान्यूज लाईव्ह
साईबाबांच्या दर्शनासाठी ठाण्यातून निघालेल्या 50 साई भक्तांच्या बसला अत्यंत भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे त्यातील मूर्त व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे
ठाण्याहून हे ५० साईभक्त नाशिक शिर्डी महामार्गावरून शिर्डी कडे येत होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, बस अक्षरशः निम्मी कापली गेली आणि साखरझोपेत असलेले दहा जण जागीच मृत्यू पावले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दुःख व्यक्त केले असून, जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यातील जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी आणि नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर उपचाराची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.