यशोगाथा

बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्राला चैतन्यमयी दिशा देऊन राज्याच्या नकाशावर झळकवणारे जळक कुटुंबिय ठरले माणदेशाचे भूषण..!

डॉ. जळक परिवारास पहिला माणवासीय भुषण पुरस्कार प्रदान

बारामती – महान्यूज लाईव्ह

विविध व्यवसायाच्या, नोकरीच्या निमित्ताने बारामतीत असलेल्या माण तालुक्यातील रहिवाशांनी माणवासीय रहिवाशी संघ स्थापन केला आहे, या संघाच्या वतीने माणवासीय भूषण पुरस्काराची सुरवात करण्यात आली आहे, यंदा पहिलाच पुरस्कार बारामतीतील प्रथितयश वैद्यकीय घराणे असलेल्या जळक परिवारास जाहीर करण्यात आला. माणदेशी फाऊंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

महाराष्ट्र बॅंकेचे निवृत्त अधिकारी काशिनाथ जळक, सुमन काशिनाथ जळक, बारामतीतील प्रसिध्द मधुमेह व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शशांक काशिनाथ जळक, नेत्ररोगतज्ञ डॉ. कोयल जळक, राज्यात प्रसिध्द असलेल्या चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे प्रमुख डॉ. आशिष जळक व प्रियांका जळक या कुटुंबाला हा पुरस्कार वितरीत करण्यात आला. यावेळी माणवासिय संघाच्या वतीने चैतन्य स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.

माणदेशी फाउंडेशनच्या चेतना सिन्हा म्हणाल्या, माणदेशातील माणूस राज्याच्या, देशाच्या कोणत्याही भागात गेला, तरी त्याची सामाजिक संवेदनशीलतेची नाळ कधीच तुटत नाही. तो सातत्याने समाजाच्या हितासाठी झटत राहतो. वर्षानुवर्षा्ंच्या व पिढ्यानपिढ्यांच्या दुष्काळी स्थितीच्या छाताडावर पाय रोवून हा माणूस इतरांना उर्मी व प्रेरणा देत असतो. बारामतीतील जळक परिवाराचे सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्य असेच प्रेरणादायी व उल्लेखनीय आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हृदयरोगतज्ज्ञ डॉ.अंजली खाडे होत्या. या प्रसंगी बिल्डर असोसिएशनचे शामराव राऊत, अशोक देवकर, बापूराव खाडे, शशिकांत देशमुख, शंकर कचरे, शहाजी खाडे, आप्पा भांडवले, पांडुरंग अवघडे, सागर खाडे, गिरीश सूर्यवंशी, मनोज देवकर, अमोल बनसोडे, अंकुश कदम, अमोल कदम, दिग्विजय गायकवाड व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश पांढरे यांनी केले. सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले व आभार मनोज खाडे यांनी मानले.

tdadmin

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

12 hours ago