बारामती : महान्यूज लाईव्ह
शहरातील अनंतनगर वसाहतीच्या परिसरात काल संध्याकाळी सात वाजता दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत काहीजण जखमी झाले तर दोन्ही गटातील परस्परविरोधी तक्रारीवरून शहर पोलिसांनी विनयभंगासह दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. महिला तक्रारदारांना पुढे करून गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी शहर पोलिसांनी एका गटातील १.धनंजय तेलंगे 2. ऋषिकेश तेलंगे 3.रोहित तेलंगे 4.चिंट्या सुतार 5.मयूर सुतार 6. तुषार शिंदे 7.करण शिंदे 8.गोविंद तेलंगे 9.बबलू कसबे 10.करण दिवटे (सर्व रा. आंबेडकर वसाहत आमराई बारामती) तर दुसऱ्या गटातील १.करण विलास सकट 2.श्याम विलास सकट 3. निलेश सकट 4.बेबीताई विलास सकट 5. बेबीताई विलास सकटची मुलगी रेश्मा (पूर्ण माहित नाही सर्व राहणार साळवे नगर अमराई, बारामती जिल्हा पुणे) यांच्यावर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान यावेळी काही गाड्यांचीही तोडफोड झाल्याचे समजते. ही भांडणे कशावरून झाली याची माहिती अद्याप नसली, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भंगार गोळा करण्यावरून ही भांडणे झाली आहेत असे सांगितले जात आहे. बारामती शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनाही केला मज्जाव..
दरम्यान आनंदनगर वसाहतीच्या परिसरात तुंबळ हाणामारी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांची वाहने त्या ठिकाणी गेली. तेव्हा भांडणांमध्ये असलेल्या महिलांनी पोलिसांना देखील कोणतेही कारवाई करण्यास मज्जाव केला. तसेच महिलाच पोलिसांकडे येऊन त्यांना अडवत होत्या असे चित्र होते.
त्यामुळे किरकोळ कारणावरून या भागात सातत्याने गंभीर गुन्हे घडत असल्याने गंभीर गुन्हे करणाऱ्यांना या पुढील काळात अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, प्रसंगी तडीपारची कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिला आहे