• Contact us
  • About us
Wednesday, February 8, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नायक बारामतीच्या समृद्धीचे – पणदऱ्याचा बुरूंज बाबांचा वाडा – भाग १

tdadmin by tdadmin
January 10, 2023
in Uncategorized
0
नायक बारामतीच्या समृद्धीचे – पणदऱ्याचा बुरूंज बाबांचा वाडा – भाग १

पणदर्‍यातील सरदार जगताप घराणे

विक्रम शिवाजीराव जगताप व घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह । मंगळवार जानेवारी १०, २०२३
वेळ : सकाळी ९ वा.

काळाचा रेटा म्हणा किंवा काळाचा महिमा. सततचा बदल हा काळाचा नियम आहे. येथे रंकाचा राव होतो आणि रावाचा रंक होतो. या सतत बदलत्या परिस्थितीमध्ये फारच थोडी घरे आपले पुर्वांपारपासूनचे अस्तित्व टिकवून ठेवू शकतात. अशापैकीच एक घर म्हणजे पणदऱ्याच्या बुरुंजाच्या वाड्यातील सरदार जगतापांचे घर. काळाच्या आघाताला या घराने कसे तोंड दिले याचीच कथा या तीन लेखांच्या मालिकेतून आपल्यापुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावल्यानंतर जी काही आडनावे सतत आपल्यापुढे येतात त्यातले एक म्हणजे जगताप. शिवकाळापुर्वीपासून सरदार जगतापांच्या नावाचा उल्लेख अनेक एतिहासिक कागदपत्रांत आढळून येतो. शिवकाळात शिवरायांचे बालमित्र व किल्ले पुरंदरचे किल्लेदार वीर सरदार गोदाजीराजे जगताप यांचे नाव इतिहासात नोंदवले गेलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यावरील पहिल्या आक्रमणाच्यावेळी मराठा-आदिलशहा युद्धात म्हणजेच पुरंदरच्या ऐतिहासिक लढाईत सरदार गोदाजीराजे जगतापांनी पराक्रमाची शर्थ केली. शहाजी महाराजांच्या काळापासून व शिवकाळात पुरंदरची लढाई, प्रतापगढ़चे युद्ध, छत्रपती शिवाजी महाराज स्वतः जातीने सहभागी असलेली मराठा साम्राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची काेल्हापूरची लढाई ते दिल्ली स्वारी व पानिपतच्या रणसंग्रामातही सरदार जगताप घराण्यातील सरदार गोदाजीराजे जगताप यांच्याप्रमाणेच विसाजी जगताप, खंडाेजी जगताप, संताजी जगताप, आबाजी जगताप अशा अनेक शूरवीरांनी पराक्रम गाजवला आहे व हिंदवी स्वराज्याकरिता आपले बलिदान दिले आहे. या गोदाजी जगतापांचे वंशज सासवड आणि पणदरे येथे असल्याच्या उल्लेख आढळतो.

पणदरे येथे जगतापांची सात बेटे आहेत. बेटे म्हणजे घराणी-वाड्यांचा समूह. त्यातील एक बेट आहे बुरुंजाच्या वाड्यात. पणदऱ्यातील बुरुज असलेला हा एकमेव वाडा. ऐकेकाळी या वाड्यात हत्ती झुलत होते. शिवकाळापासूनचा इतिहास ज्या घराण्यांना आहे, त्यातील फारच थोडी घराणी आजच्या जमान्यात आपले अस्तित्व टिकवून आहेत, त्यातील पणदरेतील जगतापांचे हे एक घराणे.पणदऱ्यातील बुरुंज असलेला हा एकमेव वाडा.

बुरुंजबाबांचा वाडा म्हणून प्रसिद्ध असलेला पणदरे पंचक्रोशीतील हा सर्वात मोठा वाडा. जवळपास एक-सव्वा एकरात पसरलेल्या या वाड्याची आज काळानूरुप पडझड झालेली असली तरी आजही या वाड्याचे भव्य रुप आपल्याला दिसून येते. पाच फूट रुंदीची तटबंदी व पंधरा वीस फूट उंचीचे बुरूंज असणारा हा भव्य ऐतिहासिक बुरूंजाचा वाडा म्हणजे मैदानी प्रदेशातील लष्करीदृष्ट्या महत्वाचा भुईकोट किल्ला. जो ब्रिटिश काळातही शाबूत होता. वाड्याच्या खालच्या बाजूस मोठे तळघर आहे. येथून दोन बाजूंना जाणारी भुयारे आहेत. ती वाड्यातून जवळपास एक किलोमीटरपर्यंत जातात. वाड्याची रचना अशी आहे की हत्ती त्याच्या अंबारीसह वाड्यात येऊ शकेल. वाड्याच्या आतच अंबारखाना आहे. काही दशकांपूर्वी वाड्यात अनेक तलवारी, ढाली तसेच अनेक ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत. पुर्वीच्या काळाची वास्तू रचना कशी होती याचा अंदाज या वाड्यावरून आपल्याला येऊ शकतो. आज पणदरे गावातूनच कॅनॉल गेला आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या वाड्यातील एक भुयार या कॅनॉलच्याही खालून गेलेले आहे.

शिवरायांचे वडील शहाजीराजे भाेसले यांच्याकडे जहागीर असलेला भीमथडी-इंदापूरच्या भागातील प्रसिद्ध सुपे परगणा व याच सुपे परगण्यातील ऐतिहासिक गाव पणदरे. शहाजीराजांच्या कारकीर्दीत युद्धमाोहिमा व धामधुमीच्या काळात पणदरे गाव हे राजकीय व लष्करीदृष्टया आपले महत्व अबाधितपणे राखून हाेते. पणदऱ्याच्या या जगताप-सरदार घराण्यात एक उल्लेखनीय परंपरा आहे. नवरात्रातील घट सगळीकडे नऊ दिवसानी उठतात. पण या घराण्याचे घट एक दिवस अगोदरच उठतात. याचे कारण छत्रपती शिवाजीराजांशी संबंधित आहे. शिवाजी महाराजांच्या आदेशामुळे पुर्वी या घराण्यातील सरदार मंडळी तातडीने युद्ध मौहिमेवर गेली. त्यामुळे त्यावेळच्या या घरातील बुजुर्ग मंडळींनी तुळजापुरच्या देवीला कौल लावून एक दिवस अगोदर घट उठविण्याची परवानगी मागितली. देवीने कौल यांच्याच बाजूने दिला आणि एक दिवस अगोदर घट उठविले गेले. तेव्हापासून आजतागायत या घरामध्ये ही परंपरा सुरु आहे. या घरातील एक पाती कोल्हापूरला गेली. ज्यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिश आर्मीकरिता पराक्रम गाजवला. कोल्हापूरच्या या घरातील आजच्या पिढीतील प्रतापसिंह जगताप हेही इंडियन आर्मीमध्ये होते. आजही महालक्ष्मी मंदिराजवळ बाबु जमाल पोस्टापाशी या जगतापांचा वाडा आहे. ज्यांच्या अनेक पिढ्या कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या गादीशी निष्ठा ठेवून होत्या व आहेत. आणखी एक जगतापांची वस्ती इंदापूर तालु्क्यातील वडापूरी येथे झाली. या वस्तीचेच नाव पंदारवाडी असे आहे. हे जगतापही याच घरातून गेलेले आहेत.

बारामती तालुक्यातील पणदरे गाव हे ऐतिहासिक काळापासून तालुक्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. हे पुर्वीपासून चळवळ्यांचे, विद्रोही-बंडखोरांचे व क्रांतीकारकांचे गाव. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढाईत उतरण्याची हाक ज्यावेळी दिली गेली, त्यावेळी बारामती तालुक्यातून सर्वाधिक लोक या गावातून स्वातंत्र्य लढ्यात उतरल्याचा दाखला आहे. या एकाच गावातून १७ स्वातंत्र्यसेनानी निघाले आहेत. यानंतर ज्यावेळी देश उभारण्यासाठी सहकाराची चळवळीने जोम धरला, पणदऱ्याने त्यावेळीदेखील अग्रक्रम ठेवला आहे. पणदरे पंचक्रोशीत जेवढ्या सहकारी संस्था आहेत, तेवढ्या संस्था महाराष्ट्रातील कुठल्याही गावात नसतील. दुधसंस्था, विविध कार्यकारी संस्था, पतसंस्था यासारख्या जवळपास तीस ते पस्तीस संस्था आज या गावात आहेत आणि विशेष म्हणजे बहुतेक सगळ्या सुस्थितीत सुरु आहेत. त्यामुळे पणदरे परिसरात चेअरमन, माजी चेअरमन, डायरेक्टर, अध्यक्ष-उपाध्यक्ष असे संबोधन असलेले शे-पाचशे लोक तरी नक्कीच सापडतील.

बारामतीचा विषय निघाला की पवारांचे नाव निघाल्याशिवाय रहात नाही. पवाराच्या राजकारणातही या गावाने मोठी भुमिका बजावली आहे. शरद पवारांच्या राजकीय जडणघडणीच्या काळात त्यांच्या पाठीशी जी मोजकी मंडळी उभी राहिली, त्यामध्येही पणदरे गावातील मंडळींचा सिंहाचा वाटा आहे. बारामती तालुक्याला दोन-दोन आमदार देणारे हे गाव. सत्तरच्या दशकापूर्वी व स्वातंत्र्योत्तर काळात स्व. आमदार उद्योजक नानासाहेब जगताप-ढाकाळकर व कै. आमदार, स्वातंत्र्यसैनिक गुलाबराव मुळीक हे दोन आमदार पणदऱ्याचे ! अर्थातच अशा गावात राजकारणाचा घेराही मोठाच असणार. हे गावही त्याला अपवाद नाही. त्यामुळे या गावातील सत्तास्थानांवर मांड ठोकण्यासाठी सरसावणारेही अनेक आहेत. बहुतेक सगळ्या ठिकाणी हे दिसते की या राजकारणाच्या राड्यात जुनी घराणी फारशी टिकलेली दिसत नाहीत. पण त्यालाही अपवाद ठरलेला हा बुरुंजाचा वाडा आहे. या घराने पणदऱ्याच्या ग्रामपंचायतीवर गेली वीस-एकवीस वर्षे आपली सत्ता टिकवून ठेवली आहे. आताच झालेल्या निवडणुकीतही या सरदार घराण्याचे चालू पिढीतील वंशज सत्यजितराजे संभाजीराजे जगताप यांनी ऐतिहासिक विजय मिळविला आहे. त्यामुळे पंचवीस वर्षे म्हणजे पाच पंचवार्षिक सत्तेत राहण्याचा मान या घराला मिळाला आहे. हा पणदऱ्याची राजकीय सत्ता एकाच वाड्याच्या हाती असण्याचा एक विक्रम आहे.

मात्र मधला एक काळ असा होता की या घरालाही बारा वर्षाचा वनवास काढावा लागला. पिढीजात शेकडो एकर असलेल्या जमिनीतील अवघी १७ एकर शिल्लक राहिली होती. तो काळ असा होता की या वाड्यात सापडलेल्या कासवाच्या पाठीच्या ढाली शेतात घमेले म्हणून वापरल्या जाऊ लागल्या होत्या. सापडलेल्या तलवारी इकडे तिकडे पडून गंज काढत होत्या. जगण्याची लढाई ऐवढी भीषण होती की या गतवैभवाकडे लक्ष देण्यास वेळच नव्हता. या वनवासातून बाहेर पडून पुन्हा या घराने उभारी घेतलेली आहे.

कडब्याची बैलगाडी चालवत असताना गाडीचे दांडे डोक्यावर पडले आणि वडील वारले त्यावेळी धनसिंह आप्पा फक्त पाच वर्षाचे होते. आजी, आई आणि आप्पा अशी तीनच माणसे त्यावेळी घरात होती. ते दिवस फार अडचणीचे होते. जवळपास बारा वर्षाचा हा वनवासच होता. हातात असलेली जमिन कसायलाही कोणी नव्हते. त्यावेळी जमिनी अर्धेलीने देऊन त्यातून येणाऱ्या उत्पन्नात सगळे वर्ष चालवावे लागे. आई, आजीबरोबर आप्पाही घरच्या शेरडा, गायांमागे जात असत. मात्र सतरा, अठरा वर्षापासून त्यांनी शेतीत नुसते लक्ष घातले नाही तर त्यात पुर्णपणे स्वत:ला झोकून दिले. या कारणाने त्यांची शाळाही सहावी सातवीतच सुटली.

वडील लवकर वारल्यामुळे धनसिंह आप्पांवर शेतीची सगळी जबाबदारी पडली. त्यांनी ती अतीशय समर्थपणे सांभाळली. धनसिंह अप्पांना अडचणीच्या काळात त्यांचे मातुल आजोबा व पुरंदरचे माजी आमदार स्वातंत्रसैनिक कै. रघुनाथराव आनंदराव पवार ऊर्फ बाबूराव पाटील यांनी मदत केली. खरे तर त्यांना अशा घराचा वारसा होता की गावकीच्या राजकारणात लक्ष द्यावे लागणे स्वाभाविक होते. पण त्यांनी आपले सगळे लक्ष शेतीकडे आणि गाई, गुरांकडे लावले. त्यांच्या हातात वडिलोपार्जित १७ एकर जमीन आली होती, ती आज ७० एकरावर जाऊन पोचली आहे. याखेरीज खंडाने त्यांच्याकडे ३३ एकर जमिन आहे. आजच्या घडीला शंभर एकराहून जास्त शेतीचा कारभार ते समर्थपणे सांभाळत आहे.

धनसिंह (अप्पा) विश्र्वनाथ जगताप यांच्या प्रमाणेच त्यांचे सुपुत्र संभाजी (काका) जगताप, पणदरे ग्रामपंचायतीच्या पहिल्या लाेकनियुक्त सरपंच सौ. मीनाक्षीकाकी संभाजीराव जगताप व नवीन पिढीतील त्यांचे तीन नातू सत्यजित संभाजीराव जगताप, विश्वजित संभाजीराव जगताप आणि अॅड अभिजीत संभाजीराव जगताप हे राजकारण-समाजकारण व शेती-उद्योगाचा वारसा समर्थपणे सांभाळत आहेत.

बुरुंजबाबांच्या वाड्याने शेतीच्या विकासात दिलेले योगदान आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.

बुरुंजबाबांच्या वाड्याच्या या कहाणीबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया आपण सत्यजित जगताप यांना ८८८८६५५७५७या मोबाईल क्रमाकांवर कळवू शकता.

( आपलीही कहाणी या लेखमालेत यावी अशी आपली इच्छा असेल तर कृपया ९८८१०९८१३८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा )

Next Post

संजय राऊत सरकारला टोमणे मारणे बंद करा, विकास कामे सांगा! बारामती शहराचा विकास म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास नव्हे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बिग ब्रेकींग – दौंडच्या सामूहिक हत्याकांडात एवढ्या लोकांचा होता सहभाग..! आता पोलिस घेणार विशेष सरकारी वकीलांची मदत! गुन्ह्यातील हत्यारे केली जप्त!

February 8, 2023

मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनाही बारामतीची भुरळ.. कृषिक प्रदर्शनाबरोबर बारामतीची कृषीपंढरी पाहण्यासाठी आज बारामतीत..

February 8, 2023

लोणार काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात स्टेट बँकेसमोर धरले धरणे..!

February 7, 2023

आमदार दत्तात्रय भरणेंची अपघातग्रस्तांना मदत.!

February 7, 2023

वरवंडला ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करीत केली निर्घृण हत्या!

February 7, 2023

पुणे जिल्ह्यातील घटना! भाचा नालायक निघाला.. मामाची पोरगी घेऊन पळून गेला.. पण मामा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने नीच निघाला.. भाच्यावर राग होता, म्हणून काय दोन भाचींना विवस्त्र करून रस्त्यात मारहाण करायची काय?

February 7, 2023

महावितरणने नव्याने वीज दरवाढ लादल्यास उद्योजक आंदोलन करणार! बारामतीत धनंजय जामदार यांचा इशारा!

February 6, 2023

ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची बदली होताच पुणे – सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यात हॉटेल आणि लॉजवर खुलेआम वेश्याव्यवसाय!

February 6, 2023
नऊ महिन्याचं बाळ खेळत होतं.. खेळता खेळता गव्हाच्या पिठात पडलं.. नाकातोंडात पीठ गेलं.. अन बाळानं जगाचा निरोप घेतला..

नऊ महिन्याचं बाळ खेळत होतं.. खेळता खेळता गव्हाच्या पिठात पडलं.. नाकातोंडात पीठ गेलं.. अन बाळानं जगाचा निरोप घेतला..

February 6, 2023

स्वराज्य सेनानी नरवीर तानाजी मालुसरे.. इतिहासात अजरामर झालेले काय होते हे अजब रसायन?

February 6, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group