हैदराबाद – महान्यूज लाईव्ह
हैदराबाद येथील सतीश एस नावाच्या व्यक्तीने कॉकेशियन शेफर्ड हा कुत्रा तब्बल २० कोटींना विकत घेतल्याने त्याची चर्चा झाली. मात्र अमेरिकेची लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्टकडे ‘ऑलिव्हिया बेन्सन’ नावाची ८०० कोटींची स्कॉटिश फोल्ड जातीची मांजर आहे.
सतीश एस यांनी बंगळूरूत हा कुत्रा विकत घेतला. त्याचे नाव त्यांनी कॅडबॉम्स ठेवले असून दीड वर्षाच्या या कुत्र्याची उंची सामान्य कुत्र्यांपेक्षा कितीतरी अधिक आहे. त्याचे वजन १०० किलो असून सर्वाधिक सुंदर कुत्र्याच्या स्पर्धेत या कुत्र्याने ३२ पदके जिंकली आहेत.
यामुळे जगातील सर्वात महागड्या प्राण्यांची चर्चा झाली. यात अर्थातच टेलर स्विफ्ट आघाडीवर आहेत. त्यांच्याकडे असलेली मांजर ही जगातील तिसरा सर्वात महागडा प्राणी असल्याचे स्पष्ट केले असून या मांजराची किंमत ८०० कोटींहून अधिक असल्याचा दावा केला आहे.
जगातील सर्वात महागड्या प्राण्यांच्या यादीत जर्मन शेफर्ड जातीचा व गुंथर कार्पोरेशनच्या मालकीचा कुत्रा प्रथम क्रमांकावर आहे. त्याची किंमत ४ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्याची मालकी इटालियन कंपनी गुंथर कॉर्पोरेशनकडे आहे.
दुसरीकडे टेलर स्विफ्ट यांची मांजर ८०० कोटींची असली तरी नाला कॅट ही जगप्रसिध्द मांजर त्याहून थोडी महागडी म्हणजे ८२५ कोटींची आहे. विशेष म्हणजे सोशल मिडीयात या मांजरीचे तब्बल ४४ लाख फॉलोअर्स आहेत. ती इन्स्टाग्रामवर नाला कॅट नावाने लोकप्रिय आहे. नाला ‘गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्येही नोंदली गेलेली मांजर आहे.