शिरूर – महान्यूज लाईव्ह
युवा पिढी ही राष्ट्राची मोठी ताकद असून युवा शक्तीचा उपयोग समाजकार्यासाठी केल्यास निश्चितच समाजात अमुलाग्र बदल होऊ शकतात असे मत वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान च्या सचिव मृणाल फराटे पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपळसुटी(ता.शिरूर) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रिय सेवा योजना विभाग व श्री वसंतराव फराटे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व लोकनेते श्री दादापाटील फराटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एनएस्एस चे हिवाळी श्रम संस्कार शिबिर नुकतेच संपन्न झाले.या वेळी त्या बोलत होत्या.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ विद्यार्थ्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरत नाही तर त्यातून उत्तम व्यक्तीमत्व घडत असते. त्यात सेवा आणि त्याग याचे विशेष महत्व आहे. शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढताना दिसून येते. फराटे पाटील शैक्षणिक संकुलाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमुळे शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना मोठा फायदा झाल्याचे त्यांनी या वेळी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब फलके यांनी विद्यार्थ्यांनी गावातील केलेल्या कामाचे कौतुक केले.तर माजी सरपंच भाऊसाहेब पंडित यांनी फराटे पाटील शैक्षणिक संकुल हे ग्रामीण भागाच्या शैक्षणिक बदलात मैलाचा दगड ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जयराम पवार यांनी गावामध्ये सात दिवसात ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पटनाट्यातून जनजागृती, महिला जनजागृती, झाडे लावा झाडे जगवा, लेक वाचवा लेक शिकवा, ग्रामसर्वेक्षण, पर्यावरण जनजागृती, कोरोना जनजागृती तसेच विविध मान्यवरांची व्याख्याने झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या हिवाळी शिबिराच्या सांगता समारंभ प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, सचिव मृणाल फराटे पाटील, विष्णूपंत शिवाजी वाबळे, सुनिल नरसिंग फलके, जालिंदर हौसिराम मोहिते, ऋषीकांत रामदास फराटे, बबन पंढरीनाथ खळदकर ह.भ.प. दशरथ वेताळ, माजी सरपंच बबन लगड, संभाजी यशवंत फराटे, सरपंच नितीन फलके, दशरथ फराटे, भास्कर थोरात, अशोक फराटे, भाऊसाहेब खळदकर, माजी सरपंच भाऊसाहेब पंडित, विलास फलके, दिलीप निंबाळकर,पंडित मोहिते, जालिंदर मोहिते, संजय थोरात, प्रदीप कापरे, ग्रामसेविका सुनिता बोरुडे, मुख्याध्यापक उत्तम कांबळे, दत्तात्रय ठोंबरे, लखन कापरे, रोहन वेताळ, दशरथ पारखे, माऊली पारखे, प्रा.नागवडे, ओव्हाळ, तसेच प्राचार्य प्रविण कुरूमकर, प्राचार्य डॉ हेमंत कांबळे, प्राचार्य डॉ विवेक सातपुते, कार्यक्रम अधिकारी प्रा. जयराम पवार, प्रा.सोनाली म्हेत्रे, प्रा. विकास गडधे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.