विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
बारामती : वाघळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत हेमंत गायकवाड यांनी सरपंच पदावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या निवडीची चर्चा संपूर्ण तालुक्यात झाली तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मात्र त्यांच्या गटाला उपसरपंच मिळू शकले नाही, तर सतीश सकुंडे यांच्या अंबामाता पॅनलच्या गणेश जाधव यांनी उपसरपंच पदी बाजी मारली.
वाघळवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीमध्ये उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली . नवनिर्वाचित सरपंच हेमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सतीश सकुंडे यांच्या अंबामाता वचनपूर्ती पॅनल कडून गणेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.व नवनिर्वाचित सरपंच यांच्या अंबामाता ग्रामविकास पॅनल कडून अनिल शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता.व अपक्ष म्हणून निशिगंधा सावंत यांचा अर्ज दाखल झाला होता.
उपसरपंच निवडणूकीमध्ये सतीश सकुंडे यांच्या अंबामाता वचनपूर्ती पॅनेल उपसरपंच पदासाठी ७ मते घेत आपले वर्चस्व स्थापित केले.तसेच नवनिर्वाचित सरपंच यांच्या अंबामाता ग्रामविकास पॅनेलला उपसरपंच पदासाठी ६ मते मिळाली. व अपक्ष निशिगंधा सावंत यांनी तटस्थ भूमिका घेतली.
उपसरपंच निवडीच्या वेळी निरीक्षक म्हणून श्री.शेख, सचिव नरसिंग राठोड, नवनिर्वाचित सदस्य तुषार सकुंडे, जितेंद्र सकुंडे, विशाल हंगिरे, प्रभाकर कांबळे, सुषमा सावंत, धनश्री जाधव, निर्मला केंगार,आशा चव्हाण, अनिता दडस, सोनाली दडस उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्य यांचे अभिनंदन पॅनेल प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विजय सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सतीश सकुंडे,माजी सरपंच सौ.नंदा सकुंडे यांनी केले.यावेळी हिंदुराव भुजबळ,सोसायटीचे चेअरमन संजय सावंत,कल्याण तुळसे,भाजपा तालुका उपाध्यक्ष बबलू सकुंडे, युवा कार्यकर्ते हिंदुराव सकुंडे, किरण गायकवाड, विकास सावंत,सागर जाधव,दीपक दणाने व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.