सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : स्वतःच्या घराच्या बांधकामाला पाणी देण्यासाठी नळाला इलेक्ट्रीक मोटर जोडत असताना विजेचा धक्का बसून सोळा वर्षांच्या मुलाचा काल मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक इंदापूर शहरात घडली आहे.
राजवर्धन रविंद्र रजपुत (वय – १६ रा.अंबिकानगर, इंदापूर) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.ही घटना बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली.या दुर्देवी घटनेमुळे अंबिका नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात चर्तुसिंग बाबुसिंग रजपुत वय 63 वर्षे रा.४० फुटी रोड इंदापूर ) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
रजपूत यांच्या नवीन घराचे बांधकाम अंबिकानगर ४० फुटी रोड येथे चालू असून त्या बांधकामास पाणी देण्यासाठी राजवर्धन गेला होता. दरम्यान पाण्याच्या नळाला मोटार जोडत असताना राजवर्धन याला विजेचा झटका लागला आणि तो बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारकामी दाखल केले मात्र डाॅक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.