दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
कधीकाळी हॉटेलमध्ये जाणे म्हणजे गैर समजले जायचे, महिलांना तर प्रवेशच नव्हता, पण काळाच्या ओघात हॉटेलिंग हा आज अपरिहार्य पर्याय बनला आहे. मात्र चैनीच्या या दुनियेत पाश्चात्यांचं अनुकरण करण्याच्या नादात कॅफेला प्रायव्हसी जपणं म्हणजे धंद्याचं लॉजिक ठरलं आणि आता आज वाई मध्ये हाच कॅफे बदनाम झाला.
वाईतील कॅफेमध्ये शहरातील नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तक्रार पिडीत मुलीने वाई पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. सध्या सर्वत्र लव्ह जिहाद वरून वातावरण तंग असतानाच ही घटना घडली असल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे
दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी आरोपी समीर सलीम पटेल (वय २६ रा. कडेगाव ता .वाई) याला तात्काळ अटक केली. या गंभीर घटनेमुळे वाई शहरातील सर्व कॅफे पोलिसांच्या रडारावर आले आहेत.
शहरातील नाकरीकांनी अशा कॅफे चालकांचा निषेध करुन त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी केल्याने कॅफे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.