दोघे डिजे लावून धिंगाणा घालत होते.. सहायक फौजदाराने फक्त डिजे बंद करायला सांगितला.. दोघांनी फौजदारालाच केली धक्काबुक्की..! पोलिसांचीच भिती नाही, दौंड शहरातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगली..!

दौंड – महान्यूज लाईव्ह

लोकांना त्रास होतो, म्हणून फक्त डिजे बंद करायला सांगितला, तर कोणा सामान्य व्यक्तीला नव्हे, तर थेट सहायक फौजदारालाच दोघांनी धक्काबुक्की केली. याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

रात्रीच्या सुमारास डिजेच्या तालावर आरडाओरडा करीत धिंगाणा घालत असलेल्यांना डीजे बंद करा असे सांगण्यासाठी गेलेल्या दौंड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश दत्तात्रय चौधरी यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद अण्णाराव जाधव व अनोक शाम जाधव (दोघेही राहणार दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत. सोमवारी ( दिनांक २) पहाटे दोन वाजण्याच्या आसपास छत्रपती संभाजी महाराज चौक गोवा गल्लीत ही घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,छत्रपती संभाजी महाराज चौक गोवा गल्ली या सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या सुमारास आनंद अण्णाराव जाधव व अनोक श्याम जाधव हे दोघे कायद्याचा भंग करून डीजे लावून त्याच्या तालावर नाचून आरडाओरडा करीत होते.

यावेळी दौंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी हे त्यांना डीजे बंद करण्यासाठी सांगत असताना त्यांनी हुज्जत घालून धक्काबुक्की केली व मोठमोठयाने आरडाओरडा करून शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण केला.

याप्रकरणी चौधरी यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेच्या निमित्ताने गुन्हेगारांना कायद्याचा वचक उरला नाही असेच प्रतित होताना दिसत आहे.

tdadmin

Recent Posts

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

23 hours ago

पेशव्यांचे सावकार, बारामतीचे विकासपुरुष – बाबुजी नाईक

उन्हाळ्याच्या बोधकथा - २ घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर तसेच काशीविश्वेश्वर मंदीर…

3 days ago