बारामती – महान्यूज लाईव्ह
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक होते असे वक्तव्य केल्यावरून त्यांच्या विरोधात शिवधर्म फाऊंडेशन व भाजपने अचानक भिगवण रस्त्यावरील अजित पवारांचे निवासस्थान आहे, त्या भागातील सहयोग सोसायटीसमोर आंदोलन केले. येथे या आंदोलकांनी अचानक अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला. या प्रकरणी शहर पोलिसांनी २८ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये बारामती तालुक्यातील ५ जणांसह इंदापूर व कर्जत तालुक्यातील २३ जणांचा समावेश आहे.
यासंदर्भात शहर पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आंदोलकांनी आंदोलनाबाबत कोणतीही परवानगी घेतली नव्हती. बारामतीतील भाजप कार्यालयासमोरून भिगवण चौकात भाजपचा नियोजित मोर्चा व सभा होती, तिकडे पोलिसांनी बंदोबस्त पुरवला होता, मात्र अचानक सहयोग सोसायटीसमोर आंदोलन सुरू केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दिपक सिताराम काटे (वय २९ रा. सराटी ता. इंदापुर जि. पुणे) , मच्छींद्र शंकर टिंगरे (वय ३८ रा. झारगडवाडी ता. बारामती जि. पुणे), अभिषेक आण्णासाहेब कोळेकर (वय १९ रा तरंगवाडी ता. इंदापुर जि. पुणे), अक्षय चंद्रकांत चव्हाण (वय २७ रा. भिगवण रोड बारामती ता. बारामती जि. पुणे), ओंकार किशोर बनकर (वय १९ रा. लाटे ता. बारामती जि. पुणे), दादासाहेब रामचंद्र बरकडे (रा. कटफळ ता. बारामती जि. पुणे),
ओंकार संजय फडतरे (वय १९ रा. सणसर ता. इंदापुर जि. पुणे), अमर सुनिल दळवी (वय १९ रा. भवानी नगर ता. इंदापुर जि. पुणे), अक्षय कल्याण गुलदड (वय 27 रा. पाटेगाव ता. कर्जत जि. नगर), रोहित गोविंद इचके (वय १८ रा. कर्जत ता. कर्जत जि नगर), गणेश भिमराव पडळकर (वय २६ रा. अकोले ता. इंदापुर जि. पुणे) सागर जालींदर पवार (वय २८ रा. बेलवाडी ता. इंदापुर जि. पुणे), स्वप्नील कैलास जोगदंड (वय – 18 रा. कर्जत ता. कर्जत जि नगर),
औंदुंबर अशोक भंडलकर (वय २० रा. भादलवाडी ता. इंदापुर जि. पुणे), अक्षय राजेंद्र गायकवाड (वय २२ रा. कर्जत ता. कर्जत जि नगर), दत्ता लालासो बोडरे (वय २४ रा. भालदवाडी ता. इंदापुर जि. पुणे), आनंद सोमनाथ शेंडे (वय १८ रा. निमगाव ता. इंदापुर जि. पुणे), युगराज वामन माकर (वय १९ रा. उंडवडी कप ता. पुरंदर जि. पुणे), सुरज विभिषण पासगे (वय २० रा. वडापुरी ता. इंदापुर जि. पुणे),
सागर बाळु मोरे (वय १९ रा. • वरकुटे खुर्द ता. इंदापुर जि. पुणे), अनिकेत बाळू भोंग (वय 20 ता. इंदापुर जि. पुणे), संकेत संतोष काळभोर (वय १९ रा. सणसर ता. इंदापुर जि. पुणे), अर्थव रोहित तरटे (वय १८ रा. कर्जत ता. कर्जत ज़ि नगर), रोहन प्रकाश शिंदे (वय १८ रा. कर्जत ता. कर्जत ज़ि नगर), किरण रविंद्र साळूखे (वय – २९ रा. भवानीनगर ता. इंदापुर जि. पुणे), प्रवण रूद्राक्ष गवळी (वय २० रा. इंदापुर ता. इंदापुर जि. पुणे), वैभव सोमनाथ शिंदे (वय २० रा. कर्जत ता. कर्जत जि नगर) व चंद्रकांत प्रल्हाद खोपडे (वय – २३, रा. तावशी ता. इंदापुर) यांच्यावर पोलीस हवालदार कल्याण खांडेकर यांनी दिलेल्या सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक निरीक्षक वाघमारे करत आहेत.