बारामती : महान्यूज लाईव्ह
आज पहाटे इचलकरंजीतील सहलीवरून निघालेल्या विद्यार्थ्यांची बस बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे पुलाच्या खाली गेल्याने 24 विद्यार्थ्यांचा अपघात झाला. या विद्यार्थ्यांना महिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तातडीने महिला शासकीय रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची व अपघातग्रस्तांची भेट घेतली त्यांना धीर दिला आणि त्यांची आपुलकीने विचारपूस केली.
आज पहाटे तीन वाजता पाहुणेवाडी येथे हा अपघात झाला. यानंतर या 24 विद्यार्थिनींना महिला शासकीय रुग्णालयात तसेच इतर ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बारामतीत हा अपघात घडल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पवार हे तातडीने महिला शासकीय रुग्णालयात पोहोचले व त्यांनी अपघातग्रस्त विद्यार्थिनींची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या उपचाराची माहिती घेतली. रोहित दादा पवार यांनी विद्यार्थिनींना दिलासा दिला. तसेच या ठिकाणी उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, असा धीर देत त्यांनी आपुलकीने विचारपूस केली.
यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रवादी युवक चे शहराध्यक्ष अविनाश बांदल यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महिला शासकीय रुग्णालयात डॉक्टर सदानंद काळे यांनी दिल्या जाणाऱ्या उपचाराची माहिती रोहित पवार यांना दिली. अपघातातील एक रूग्ण श्रीपाल हॉस्पिटल येथे दाखल आहे, त्या ठिकाणी रोहित पवार यांनी तातडीने जाऊन भेट घेऊन तिच्यावरील उपचाराची माहिती डॉ. राजेंद्र मुथा व डॉक्टर सौरभ मुथा यांच्याकडून घेतली.