सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर शहरात व्यावसायिक व व्यापारी यांच्या विविध अडचणींसंदर्भात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये इंदापूर शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्षपदी शहा ब्रदर्स अँड कंपनीचे संचालक भरतशेठ शहा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सिध्देश्वर मंदिर येथे नुकतीच शहरातील छोट्या मोठ्या व्यवसायिक व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील व्यवसायिक उपस्थित होते. शहरातील व्यवसायिक व्यापाऱ्यांवर येणाऱ्या विविध आणि अडचणींवर चर्चा झाली. यावेळी सर्व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची समस्या निर्मूलन करण्यासाठी महासंघाची स्थापना करण्यात आली.
यावेळी महासंघाची कार्यकारणीची करण्यात येवून ती कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये नंदकुमार शहा – कार्याध्यक्ष, संदीप वाशिंबेकर – उपाध्यक्ष, मेघश्याम पाटील – सचिव, दिलीप कासार – खजिनदार, प्रशांत पवार – सहसचिव यांची सर्वानुमते निवड झाली.
शहरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, शहरातील सर्व छोट्या मोठ्या व्यवसायिकांना येणाऱ्या समस्यांवर आपण निश्चित प्रयत्न केले जातील अशी ग्वाही महासंघाचे अध्यक्ष भरत शहा यांनी दिली.