बारामती : महान्यूज लाईव्ह
इचलकरंजी येथून शिर्डी व औरंगाबाद येथे गेलेल्या विद्यार्थिनींच्या सहलीच्या बसला माघारी परतताना बारामतीतील पाहुणेवाडी येथे पहाटे तीन वाजता अपघात झाला. यात तीन मुली गंभीर तर 24 मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत.
इचलकरंजी येथील सागर क्लासेस या खाजगी क्लासेसच्या वतीने इचलकरंजी ते शिर्डी, औरंगाबाद अशी सहल विद्यार्थ्यांची आयोजित करण्यात आली होती. 48 विद्यार्थिनी व 4 शिक्षकांना घेऊन ही बस बारामतीमार्गे शिर्डीहून इचलकरंजीला निघाली होती.
यावेळी बारामतीवरून पाहुणेवाडी येथे पोहोचल्यानंतर बस चालकाला अंदाज न आल्याने व चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून बस थेट खाली गेली. यामध्ये तीन मुली गंभीर जखमा झाल्या तर 24 मुलींना किरकोळ दुखापत झाले आहे. जखमींना उपचारासाठी बारामतीत शासकीय रुग्णालयात श दाखल करण्यात आले आहे.