आमदार जयकुमार गोरे लवकर बरे व्हावे यासाठी निमगाव केतकी त ग्रामदैवत केतकेश्वर महाराज व गणेशाच्या चरणी दुग्धाभिषेक. अपघाताची चौकशी करावी : सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू यांची मागणी
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : दहिवडी माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे लवकर बरे व्हावे व त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी निमगाव केतकी येथे सावता परिषदेच्या वतीने सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत केतकेश्वर महाराज व श्री गणेशाच्या चरणी दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी बोलताना संतोष राजगुरू म्हणाले की, आमदार जयकुमार गोरे हे माळी समाजाचे आशास्थान आहेत. भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. सावता परिषदेचा व त्यांचा खूप दिवसाचा ऋणानुबंध आहे. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रामदेवतांना दुग्धाभिषेक करण्यात आला.
आमदार गोरे यांच्या झालेल्या अपघाताची चौकशी करण्याची मागणीही संतोष राजगुरू यांनी केली.
यावेळी विकास सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन विजय महाजन, पप्पू मोरे, विकास सोसायटीचे संचालक महादेव शेंडे, चंद्रकांत हेगडे, भालचंद्र हेमाडे, नारायण देशमाने, रोहित लिंगे, स्नेहल वाघ, हर्षद लिंगे आदी उपस्थित होते.