दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
पाचगणीहून रात्री दिड वाजण्याच्या सुमारास वाई कडे जात असताना कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दरीच्या बाजुला असणाऱ्या संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली.
कार अंदाजे ५० ते ६० फुट खोल दरीत कोसळली. या अपघाताची माहिती वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख विजय शिर्के व किरण निंबाळकर यांना समजली.
क्षणाचाही विलंब न करता पहाटे दिड वाजता रुग्णवाहिका सोबत घेऊन हे पथक तातडीने अपघातस्थळावर दाखल झाले. दरीत कोसळलेल्या कारपर्यंत पोहचून कारचालक केदार विजय जानकर (वय २२ रा. शाहुनगर, पाचगणी) यांना बाहेर काढले.
घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या जानकर यांना बाहेर काढून वर आणले, केदार यांचे दैव बलवत्तर असल्यानेच ते या झालेल्या भीषण अपघातातून सुखरूप बचावले. पोलिसांनी केदार याची चौकशी केली व रुग्णालयात दाखल होण्याबाबत सांगितले, तेव्हा केदार याने वाईचे पोलिस माझ्या आयुष्यासाठी देवदूत ठरले, अपघातावेळी उपचार महत्त्वाचा असतोच, पण त्यापेक्षा आधाराची गरज जास्त असते असे भावनीक उद्गार काढले व पोलिसांचे आभार मानले.