दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : पसरणी (ता. वाई) येथील बबन शंकर आंब्राळे व त्यांच्या कुटुंबीयांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे, हा गुन्हा खोटा असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे म्हणणे असून या प्रकरणी वाई तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वाईचे तहसीलदार रणजीत भोसले व उपविभागिय पोलिस अधिकारी शितल जानवे-खराडे यांना निवेदन देण्यात आले.
निप्षक्ष पध्दतीने व कोणत्याही दबावास बळी न पडता या प्रकरणाचा तपास करावा, तसेच खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पसरणी (ता. वाई) येथील बबन शंकर आंब्राळे व त्यांचे सहकुटुंबीय यांच्यावर गेल्या ७/८ वर्षापासून खोट्या तक्रारी दाखल करुन इतर समाजाला कायमस्वरूपी नाहक त्रास दिला जात आहे. असे मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.
जातीचा आधार घेवून अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करण्याची भिती वेळोवेळी दाखवली जात आहे. कोणतीही घटना घडली नसताना देखील २२ डिसेंबर २०२२ रोजी आंब्राळे कुटुंबीयांविरुध्द अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यावरून या घटनेबाबत वाई तालुका मराठी क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकत्रित आले व त्यांनी दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याचा जाहीर निषेध केला.
येथून पुढे अॅट्रॉसिटी सारख्या गुन्ह्याची, गुन्हा दाखल होण्याअगोदर सखोल चौकशी आणि शहानिशा होणे आवश्यक आहे असे अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकत्यांनी केली आहे. पोलिसांमार्फत असे खोटे गुन्हे दाखल झाल्यावर दोन जातीमध्ये संघर्षाची ठिणगी पडून निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामास पोलिस अधिकारी जबाबदार असतील असा इशारा कार्यकत्यांनी दिला आहे.
दरम्यान या प्रकरणी शेकडो कार्यकर्ते एकत्र येऊन अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोर्चाने वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयावर गेले. तेथे घोषणाबाजी केली. दाखल केलेला गुन्हा मागे न घेतल्यास वाई तालुक्यात बंद पुकारला जाईल असाही इशारा देण्यात आला.
याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे उपाध्यक्ष अजित मांढरे म्हणाले, आंब्रांळे व साळुंखे यांचा जमीनीच्या रस्त्याचा वाद होता. यासाठी आंब्राळे यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत उच्च न्यायालया पर्यंत लढा दिला. त्यांच्या जमिनीत जाण्यायेण्याचा पु
र्वापार रस्ता खुला करण्याचे व त्यांना साळुंखे यांच्याकडुन कोणताही त्रास होवू नये याची खबरदारी घ्यावी असा निकाल न्यायालयाने दिला आहे.
या निकालाच्या आधारे प्रशासनाने अतिक्रमण केलेला रस्ता मोकळा करुन दिला. त्याचा राग मनात धरु
नच हा खोटा अँट्रासीटीचा गुन्हा दाखल केला आहे. अँट्रासीटीचा चुकीचा वापर करुन समाजातील काही प्रवृत्ती इतर समाजाला वे
ठीस धरत आहेत. या कायद्यात सुधारणा होण्यासाठीच मराठा समाज एक झाला होता. परं
तू त
रीही समाजातील अशा प्रवृत्तींमुळे समाजासमाजात तेढ निर्माण होत आहे. आंब्राळे कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास हा लढा भविष्यात अजून
तीव्र करण्यात येई
ल असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल जगताप विक्रांत डोंगरे, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, भाजपाचे काशिनाथ शेलार, अजय मांढरे, , प्रदीप चोरगे, चरण गायकवाड, राजेश शिंदे, प्रदीप जायगुडे, विक्रम वाघ, काका मोझर, संदिप घोरपडे, सचिन घाडगे, संजय गायकवाड, बाळासाहेब चिरगुटे, विजय ढेकाने, अक्षय निंबाळकर आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते.