जोधपूर – महान्यूज लाईव्ह
चोरांच्या टोळीने पितळेची मुर्ती सोन्याची आहे असे सांगून ती चक्क १६ लाखांना विकली.. कसे गंडवले या अविर्भावात चोरटे होते.. इकडे ती मुर्ती आवडली म्हणून खरेदी केलेल्यांनीही १६ लाख दिले होते, मात्र त्या नोटा बनावट होत्या.. चोरावर मोर होणारा हा प्रकार अगदी सहज पोलिसांना सापडला.. जेव्हा पोलिस रस्त्यावर वाहनांची तपासणी करीत होते.
भगवान महावीरांच्या पितळेच्या मुर्ती सोन्याच्या म्हणून विकणाऱ्या व खरेदीसाठी बनावट नोटा देणाऱ्या दोन्ही बाजूकडील ४ जणांना बिजनौर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या व्यवहारातील १५ लाख ८६ हजार रुपयांच्या नोटाही बनावट निघाल्याने पोलिसांचेही डोके चक्रावले होते.
बिजनौरचे पोलिस अधिक्षक देहत रामराज यांनी पत्रकार परीषदेत याची माहिती दिली. चोरावर मोर होणाऱ्या या घटनेत आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
गंमत म्हणजे ही चोरी आणि फसवणूक अगदी सहज पोलिसांना सापडली. बिजनौर जिल्ह्यातील मंदवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी पेट्रोलींग सुरू केले होते. ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करताना तिथे मारुती वॅगन आर चारचाकी आली.
या चारचाकीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये खूप नोटा आढळून आल्या. एवढी मोठी रक्कम आढळल्याने पोलिसांनी चारचाकी मधील चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिस चौकीत या नोटा मोजण्यास घेतल्या, तेव्हा १५ लाख ८३ हजार रुपये आढळून आले.
एवढी रक्कम आली कोठून असा प्रश्न करीत पोलिसांनी त्यांची चौकशी करण्यास सुरवात केली, तेव्हा या चौघांच्या सांगण्यात विसंगती आढळली. मग पोलिसांनी त्यांचे मोबाईल तपासले. यामध्ये मोबाईलमध्ये जैन समाजातील देवतांचे मुर्तीचे फोटो आढळून आले.
त्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला. तेव्हा पोपटासारखे हे चौघे बोलू लागले. भगवान महावीरांच्या मुर्तीला पॉलिश करून स्वस्तात मुर्ती विकत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावरून पोलिसांनी ज्यांना मुर्ती विकली, त्यांच्याशी संपर्क साधला व तुम्ही खरेदी केलेली मुर्ती बनावट असल्याची माहिती दिली. खरेदीदार त्यापुढचे निघाले, त्यांनी पोलिसांना प्रतिप्रश्न केला, मग आम्ही तरी नोटा कुठे खऱ्या दिल्या आहेत?