सातारा – महान्यूज लाईव्ह
कर्मवीरनगर (कोडोली) येथील शर्वरी सुधीर जाधव या एका वर्षाच्या चिमुरडीनं काल (रविवारी) रात्री शेजारी राहणाऱ्या लहान मुलीनं जेली चॉकलेट खाण्यास दिलं.. चॉकलेट तिच्या घशात अडकलं आणि त्यात शर्वरीचा जीव गेला.
शर्वरी जाधव या चिमुरडीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण सातारा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिलेले चॉकलेट घशात अडकल्यानंतर ती उलट्या करू लागली. त्यानंतर ती बेशुध्द पडली.
हे पाहताच शर्वरीच्या आईने शेजारील राहणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेत जिल्हा शासकीय रुग्णालयात तातडीने नेले. मात्र तोपर्यंत सारे आटोपले होते. डॉक्टरांनी शर्वरीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आणि आईने टाहो फोडला.