भाजपच्या टीकेवर राष्ट्रवादी कडाडली… तालुकाध्यक्ष कोकाटे म्हणाले, भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.जामदार यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासण्याची गरज..!! जामदार यांच्यासाठी येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये संपर्क साधणार..! शरद जामदार यांनी वकिली सोडून खोटे बोलण्याचा नवीन धंदा सुरू केला आहे : कोकाटे
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी ग्रामपंचायत चे सरपंच व सहा ग्रामपंचायत मध्ये बहुमत असणाऱ्या सदस्यांचा सत्कार सोहळा झाला. 2 हजार कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांसमोर सरपंच व बहुमत असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांची शिरगणती केली. या सत्कार सोहळ्याची थेट प्रक्षेपण इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्राने पाहिले असतानाही भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांना अजूनही विश्वास बसला नाही. त्यामुळे जामदार यांना आता मानसोपचार तज्ञाकडून तपासण्याची गरज आहे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिला आहे.
हनुमंत कोकाटे यांनी पत्रकारांना सांगितले की, काल आमदार दत्तात्रय भरणे ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत 12 नवनिर्वाचित सरपंच व 6 ग्रामपंचायत मध्ये बहुमत असलेल्या सर्व सदस्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी जवळपास 154 ग्रामपंचायत सदस्य यांचा फेटा घालून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जवळपास 2 हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी बहुतांशी पत्रकारांनी हा सोहळा लाईव्ह प्रक्षेपण केला होता. या लाईव्ह प्रक्षेपणावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वांच्या समोर सरपंचांची शिरगणतीच केली. हे साऱ्या तालुक्यानेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे आणि जर या लाईव्ह व्हिडिओवर भाजप पक्षाच्या तालुकाध्यक्षाला तसेच त्यांच्या नेत्यांना विश्वास राहिला नसल्याचा आरोप कोकाटे यांनी केला आहे.
मागील आठवड्यात निराभिमा कारखान्यावरील उसाच्या टनेजमध्ये काटा मारून शेतकऱ्यांची लयलूट चाललेल्या खोट्या धंद्यावर शेतकऱ्यांनी लाईव्ह व्हिडिओ बनवून सर्वत्र पाठवला होता. आपण सहकारी कारखाने लुटून टक्केवारी कमिशन घेऊन शेतकऱ्यांच्या एफ आर पी न देता, कामगारांचा पगार न देता सर्व शेतकऱ्यांचा व कामगारांचा कष्टाचा पैसा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी लुटल्याचा आरोप कोकाटे यांनी केला आहे.
दोनदा विधानसभेला धुळ चारून सुद्धा अजून खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे हा धंदा चालू ठेवला आहे. कालच्या सरपंच शिरगणतीचे लाईव्ह व्हिडिओ वरती विश्वास बसत नसेल तर आपल्याला आता मानसोपचार तज्ञाकडून तपासण्याची गरज असल्याचे कोकाटे यांनी म्हटले आहे.
यासाठी आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून इंदापूरच्या या पेशंटला दाखल करून घेण्याची विनंती करणार आहे. तरी वकील असलेल्या शरद जामदारांनी यावर डोकं शांत ठेवून वेळीच उपचार करून घ्यावे कारण यापुढे इंदापूर तालुक्यातील विकास कामांची तसेच पक्षवाढीची बुलेट ट्रेन सुसाट धावत राहत असल्याने यापुढचे धक्के आपल्याला सहन होणार नाही. म्हणून आपण वेळीच उपचार करून घ्यावे असे गरजेचे वाटते असा उपरोधीत टोला तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी या वेळी दिला.