मुंबई – महान्यूज लाईव्ह
कोरोनाची महामारी चीनमध्ये सुरू आहे. चीनमध्ये लाखो कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगात पुन्हा चिंतेचे वातावऱण आहे, या पार्श्वभूमीवर भारतातही मागील पुनरावृत्ती टाळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्रात देवस्थानांच्या ठिकाणी मास्कसक्ती झाली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रात मास्कसक्ती करण्याची शक्यता आहे. याची घोषणा मुख्यमंत्री करण्याची शक्यता वर्तवली जात असून सुरवातीला सरकारी कार्यालयांमध्ये मास्कसक्ती केली जाण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मास्कसक्ती होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली असून त्यातही सुरवातीच्या टप्प्यात मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यांतील शासकीय कार्यालयामध्ये मास्कसक्ती केली जाण्याची चिन्हे आहेत.