• Contact us
  • About us
Friday, June 2, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संभाजी ब्रिगेड झाली २५ वर्षांची.. २८ डिसेंबर रोजी पुण्यात रौप्यमहोत्सवी अधिवेशन..! ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ अशी देणार नवी दिशा..

tdadmin by tdadmin
December 23, 2022
in यशोगाथा, संपादकीय, सामाजिक, शिक्षण, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
संभाजी ब्रिगेड झाली २५ वर्षांची.. २८ डिसेंबर रोजी पुण्यात रौप्यमहोत्सवी अधिवेशन..! ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ अशी देणार नवी दिशा..

पुणे – महान्यूज लाईव्ह

राज्यभरात नेहमीच पुरोगामी चळवळीच्या अग्रस्थानी राहीलेली संभाजी ब्रिगेड येत्या २८ डिसेंबर रोजी २५ वर्षा्ंची होत आहे. ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन येत्या बुधवारी (ता. २८) सकाळी १० ते सायं. ७ या वेळेत पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे, इंदोरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, तंजावरचे युवराज संभाजराजे भोसले आदी या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बुधवारी सकाळी १० वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील हे या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील, तर इंदोरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर व तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले या उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत.

या उदघाटन सत्रादरम्यान मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना जीवनगौरव पुरस्काराने, तसेच अभिनेते अशोक समर्थ आणि लेखक अरविंद जगताप यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सायंकाळी ५:३० वाजता या अधिवेशनाचा समारोप करणार आहेत. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे अध्यक्षस्थानी असतील. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा.मा. म. देशमुख व डॉ. जयसिंगराव पवार यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव आणि प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यावेळी उपस्थित राहणार आहेत. शाल, स्मृतिचिन्ह आणि व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

दिवसभर चालणाऱ्या या अधिवेशनात विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडच्या ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ या संकल्पनेवर आधारित “खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतरचा भारत आणि जग” या विषयावरील चर्चासत्र होणार आहे.

या चर्चासत्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पत्रकार श्रीराम पवार आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड हे सहभागी होणार आहेत.

एकविसावे शतक – स्टार्टअप्सचे युग या विषयावर परिसंवाद होणार आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, मिटकॉन फोरमचे संचालक गणेश खामगळ आणि प्रसिध्द अभिनेता निखील चव्हाण हे या परिसंवादात सहभागी होणार आहेत.

संभाजी ब्रिगेडच्या ‘मराठा कम्युनिटी बिजनेस कम्युनिटी’ या महत्वाकांक्षी धोरणाच्या अनुषंगाने “आरक्षणाकडून अर्थकारणाकडे” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. क्रेडाईचे राष्ट्रीय चेअरमन व प्रसिद्ध उद्योजक सतिश मगर, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे चेअरमन राजेंद्र पवार, सह्याद्री फॉर्म्सचे मॅनेजिंग डायरेक्टर विलास शिंदे, सिल्व्हर ज्युबली मोटर्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर राजवर्धिनी जगताप आणि बीव्हीजी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर हणमंत गायकवाड हे चर्चासत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

Next Post

काय बे साहेब?.. एवढी वर्षे झाली, लग्न होत नाहीए.. लग्नासाठी मुलगी देता का? तेवढं सरकारकडून काही झालं तर बघा ना बे…! सोलापूरातील नवरदेवांचा मोर्चाचा व्हिडीओ येथे पहा.. बायकोसाठी पोरं रस्त्यावर आलेली पहा..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंदापूर काँग्रेस कमिटीची भव्य इमारत आता इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर..! आता ‘काँग्रेस’ ऐवजी ‘भाजप’ कार्यकर्त्यांची वर्दळ दिसणार..!

June 1, 2023

इंदापुरातली काँग्रेसची उरलीसुरली आठवण मिटली.. होती ती फक्त एक ट्रस्ट, जिच्यावर शिक्कामोर्तब झालं!

June 1, 2023
बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता झाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय! भाजपा कार्यकर्ते गोविंद देवकाते यांच्या पाठपुराव्याला यश!

बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता झाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय! भाजपा कार्यकर्ते गोविंद देवकाते यांच्या पाठपुराव्याला यश!

May 31, 2023

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने दिला जात असलेला पुरस्कार
महिलांना प्रेरणादायी ठरेल! डीवायएसपी बाळासाहेब भालचीम यांचं मत!

May 31, 2023

वाई शहरातील आंबेडकरनगर मध्ये विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू!

May 31, 2023

तर छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा! वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा राष्ट्रवादीला टोला!

May 31, 2023

दोघांनी पार्टी करायचं ठरवलं.. मटण आणलं.. पण मटण वाढण्यात कमीजास्तपणा झाला.. इथेच गफला झाला.. राग आला म्हणून जितू देवाघरी गेला..

May 31, 2023
पणदरे पंचक्रोशी व्हाटसएप ग्रुपवर पोलिसांची कारवाई! सोशल मिडियावर व्यक्त होताना काळजी घेण्याची गरज!

पणदरे पंचक्रोशी व्हाटसएप ग्रुपवर पोलिसांची कारवाई! सोशल मिडियावर व्यक्त होताना काळजी घेण्याची गरज!

May 31, 2023

आता छत्रपती कारखान्याच्या मतदार यादीचं काय होणार? शिंदे- भाजप सरकारने अक्रियाशील सभासदांबाबत असा निर्णय घेतला!

May 31, 2023

मुलीचं डोळ्यासमोर अपहरण केल.. मग आईवडीलांनी रेल्वेखाली जीव दिला.. संतापलेल्या नातेवाईकांनी आरोपीच्या घरातच सरण रचलं.. चितेला भडाग्नी दिला..!

May 31, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group