भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारचा टायर फुटला.. अन् बहिण-भावाचे नशिबही फुटले! भीषण अपघातात दोघांचा मृत्यू!

पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद येथील घटना!

दौंड : महान्यूज लाईव्ह

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील मळद येथे पुण्याकडून सोलापूर दिशेला भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट गाडीचा अचानक टायर फुटला. त्यामुळे गाडी दुभाजकावरून विरोधी बाजूच्या लेनवरून येणाऱ्या कंटेनरला जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

ही माहिती दौंड पोलिसांनी दिली. शिल्पा तुलशी गिरी ( वय ३० ) व साधव गोरख गिरी यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.२२) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

हे दोघे पुण्याकडून भालकी (जि. बिदर)कडे सुट्टीसाठी स्विफ्ट गाडीतून प्रवास करीत होते. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने प्रवास करीत असताना दौंड तालुक्यातील मळद हद्दीत अचानक स्विफ्टचा टायर फुटला. त्यामुळे स्विफ्ट दुभाजक ओलांडून विरोधी बाजूच्या सोलापूर लेनवरील कंटेनरला जाऊन जोरात धडकली.

कंटेनरच्या धडकेने स्विफ्टच्या पुढील व डाव्या बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाला. स्विफ्टमधील शिल्पा तुलसी अपघातात गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला, तर गाडी चालविणारा तिचा भाऊ सावध गोरख गीर हा देखील गंभीर जखमी झाला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी सावध विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.

Maha News Live

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

13 hours ago