• Contact us
  • About us
Saturday, February 4, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

होय मी माळकरी.. आपला भागवत धर्म…तो मोहन भागवत धर्म नव्हे…!

tdadmin by tdadmin
December 28, 2022
in संपादकीय, सामाजिक, आरोग्य, आर्थिक, कथा, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

संपादकीय – ज्ञानेश्वर रायते, बारामती.

वारकरी कोण?… माळकरी कोण? ही व्याख्या सातत्याने पुढे येते.. काहीच समजत नाही, तेव्हा बुवा, महाराज या विशेषणांनी माळकऱ्याचा आदराने उल्लेख होतो.. मी देखील माळकरी आहे.. पिढ्यानपिढ्यांचा आहे.. माझी आजी, माझी आई, माझे वडील, मी, माझे कुटुंब आणि आता पुन्हा माझी मुले देखील माळकरी आहेत. ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा घरात वाचली जाते. विजयप्रताप, पांडवप्रतापापासून नवनाथाच्या कथासारापर्यंत.. अन शिवलिलामृतापासून शनिमहात्म्यापर्यंत सारं सारं मनापासून वाचलं जातं..

गेल्या काही दिवसांत एका राजकीय पक्षाच्या महिलेच्या विरोधात तथाकथित वारकरी आंदोलन करताहेत. त्याची जरा किव वाटली म्हणून लिहावं वाटलं.. हल्ली हिंदू आणि हिंदूत्वावर बोलायचं ठरवलं तरी अंगावर काटा यावा असाच बाका प्रसंग देशात उभा राहीलेला दिसतो.. कपड्यांवरून हिंदू खतरे मे अशा घोषणा ऐकायला येत आहेत आणि उगीचच घरात बसून आपल्यावर धार्मिक बॉम्बवर्षाव होतोय असे वाटू लागते.

आता तर गावागावात तथाकथित हिंदूत्ववादी मंडळी येऊन काहीबाही सांगू लागली आहेत. वारकऱ्यांना भडकावून देऊन, त्यातील उजव्या विचारसरणीच्या मंडळींना थेट अध्यात्मिक आघाड्यांमध्ये कोंबून त्यांच्याकडून विशिष्ठ राजकीय पक्षांचा जनाधार निर्माण करताहेत. हे करताना थेट ध्रुवीकरण करू पाहताहेत आणि वैष्णवांचा हा धर्म सहिष्णूतेचा धर्म आहे ही ओळख पूसू पाहताहेत..!

माझा मूळ प्रश्न होता, तो गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारकऱ्यांच्या आंदोलनाचा. वारकरी ही तुकोबारायांच्या, ज्ञानोबांच्या, संत चोखामहाराज, गाडगेबाबा, संत सावतामहाराज, जनाई, मुक्ताई, सोपानकाकांच्या दिलेल्या अमूल्य ज्ञानसागराच्या वारशाने चालणारी परंपरा.. भागवत संप्रदायाची ही परंपरा.. बुध्दीप्रामाण्यवाद शिकविणारी, त्याच मार्गाने चालणारी, अंधश्रध्देला अजिबात भीक न घालणारी, वास्तवाला भिडणारी परंपरा.. म्हणूनच एकेकाळी उदकी अभंग रक्षिले, कौतुक तुकोबांचे या आरतीतील ओळी देखील वैचारिकदृष्ट्या बंडखोरी दाखवत वारकऱ्यांनी फक्त अभंग रक्षिले, तैसे तुकोबांचे अशा बदलण्यापर्यंतचे धाडस दाखवले.

संत ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितले, त्यावर बोलण्यापेक्षा आम्ही त्यांनी भिंत कशी चालवली, रेड्यामुखी वेद बोलवले, यावरच किर्तन चालवतो. कसल्या कसल्या दृष्टांत, सिध्दांतांनी किर्तनात आम्ही सहजपणे अंधश्रध्दा चालवतो. तेव्हा काहीच जाणवत नाही की, तुकोबाराय सांगून गेले.. की, विष्णूमय जग, वैष्णवांचा धर्म.. भेदाभेद भ्रम अंमगळ… कर्म करोनी म्हणती साधू.. ऐसे कैसे झाले भोंदू.. अगदी तुकोबाराय हेही सांगून गेले की, परउपकारी नेणे परनिंदा.. परस्त्रिया सदा बहिणी माया.. शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडीलांचे, तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ.. परमपद बळ वैराग्याचे..!!

हे अभंग कोणीकडे आणि स्वतःला किर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार.. अगदीच शेवटी माळकरी म्हणवणारे कोणीतरी तथाकथित एका महिलेची जिवंतपणी अंत्ययात्रा काढताना दिसले. हा आमचा वारकरी धर्म आहे का? ते जर फक्त वारकरी असतील, राजकारणी नसतील, तर तुकोबारायांचा वरील अभंग त्यांना माहिती नसावा असे म्हटले तर मूर्खपणाचे ठरेल.

शिवाय जर वारकरी असतील, तर त्यांना विकृत राजकारण खात्रीशीर कळायलाच हवे. सर्व बाजूंनी विचार करायला हवा. सध्या राजकारणात दलबदलूंचा सुकाळ झाला आहे. निष्ठा नावालाही राहीलेली नाही. सगळे बाटगे फिरत आहेत. अशावेळी तो कार्यकर्ता, नेता आज ज्या पक्षात आहे, त्या पक्षाची, त्याच्या विचारधारेची तळी उचलतो. एवढी बेमालूमपणे की, जणू याच्या आज्या, पणज्यांनीच या पक्षाची निर्मिती, स्थापना केली आहे. उद्या ज्या पक्षात जातील, तिथे त्या पक्षाची तळी, तेथील विचारधारा, अगदी पूर्वापार त्या पक्षात असल्यासारखी उचलतात आणि महत्वाचे म्हणजे काल ज्या पक्षात होतो, तो पक्ष किती घाणेरड्या प्रवृत्तीचा आहे, हे सांगायला अजिबात लाजत नाहीत.

अशा घाणेरड्या डबक्यातील ही नेतेमंडळी एकमेकांवर चिखल उडवताना ते आपला वापर करीत आहेत, एवढेही वारकऱ्यांना कळू नये? त्या सुषमा अंधारेंचा विषय थेटच घेऊ. ज्या पक्ष किंवा संघटनेत यापूर्वी या नेत्या होत्या, तेथील विचारधारेनुसार त्यांनी म्हणे काही वर्षांपूर्वी वक्तव्य केलेले व्हिडीओ आता फिरवून वारकऱ्यांना भडकवण्याचे काम तथाकथित हिंदूत्ववादी संघटना, कार्यकर्त्यांनी केले. खरं कारण काय आहे? तर त्या आक्रमकपणे भाषण करतात, आपल्या आवडीच्या पक्षाला अडचणीत आणतात.. म्हणून!

मात्र अशा सडक्या गोष्टींवर आपण किती भडकायचे ? हे वारकऱ्यांनी ठरवावे. किर्तनकारांनी ठरवावे. मुळात भागवत संप्रदायाचा राजकारणासाठी वापर करूच नये. मात्र अलिकडच्या काळात धार्मिक आघाड्या केल्या जात आहेत आणि त्यात माळकऱ्यांनाही ओवले जात आहे. हे अतिशय दुर्दैव आहे. विशिष्ठ पक्षात जाऊन मग ही मंडळी त्या- त्या पक्षाचे थेट मत किर्तनातून मांडू लागली आहेत हे आणखी दुर्दैव..

वारकऱ्यांनो, राजकारण्यांना काय करायचे ते करू द्या… आपला कोणीतरी राजकारणी वापर करतोय याचे भान प्रत्येक माळकऱ्याने ठेवले पाहिजे, तरच तुकोबारायांच्या विचारांचे वारस म्हणवून घेता येईल. तुकोबाराय म्हणून गेले, सालोमालो हरिचे दास। म्हणऊन केला अवघा नास।। अवघें बचमंगळ केलें। म्हणती एकाचे आपुलें। मोडूनि संतांची वचनें। करिती आपणां भूषणें।। तुकोबारायांच्या या उक्तीचा डोक्यावर नाही, डोक्यातून विचार करा आणि आपला भागवत संप्रदाय आहे.. मोहन भागवत संप्रदाय नाही हे मनावर ठसू द्या..

अर्थात जर आपण आपल्या संतांविषयी कोणी काही बोलले तर नाठाळांच्या माथी हाणू काठी असे म्हणणार असू, तर पहिल्यांदा काठी त्यांच्याही डोक्यात बसलीच पाहिजे, जे गेली काही महिने सातत्याने आपल्या महापुरूषांचा अवमान करीत आहेत, जाणीवपूर्वक करीत आहेत… मात्र आपण त्याविषयी काहीच बोलत नाही. फक्त विशिष्ठ दोन राजकीय पक्षांमध्ये असलेल्या राजकीय चिखलफेकीत सरळसरळ एकाची बाजू घेत आहोत, हे सर्वथा योग्य नाही.

हे वारकऱ्यांचे, वारकरी धर्माचे वाटोळे करण्याची चाल आहे, यावर वेळीच बोध घेतला पाहिजे. कोणीतरी म्हणून गेले आहे की, पॉलिटिक्स इज गेम ऑफ रास्कल.. याचा विचार केला, तर किर्तन ऐकायला, प्रबोधन, प्रवचन ऐकायला केवळ एकाच पक्षाची लोक येत नाहीत. सगळेच हिंदू येतात. ज्यांना धर्माचे विकृतीकरण आवडत नाही, मात्र त्यांना धर्म श्रेष्ठ वाटतो. काही जणांना धर्माचे फक्त अवडंबर करायचे आहे या साऱ्यांचा विचार करा. आपला वापर करू देऊ नका. तो करू देणे योग्य ठरणार नाही.

वारकऱ्यांना हे माहितीच आहे की, आपले सगळे संत हे शेतकरी परंपरेतले, अठरापगड जातीतले होते. विठोबावर प्रचंड श्रध्दा असलेल्या या संतांनी कधीच माणसांचा द्वेष शिकवला नाही. त्यांनी माणूसकीचा धर्म शिकवला. त्यांनी कधीही दांभिक अध्यात्म शिकवले नाही. देवाला मानतानाच त्यांनी माणसाला अगोदर महत्वाचे मानले हे विसरता कामा नये.

वारकरी धर्मात, परंपरेत विज्ञान आणि समाजविरोधी काल्पनिक घटनांना महत्व आहे का? निश्चितच नाही. गाडगेबाबांनी त्यांच्या किर्तनातून गावावरची श्रध्दा शिकवली. त्यांनी अंधश्रध्देवर प्रहार केले, ते तुकोबांनीही केले आणि सगळ्याच संतांनी केले. मग संतांच्या नावावर खपवल्या जाणाऱ्या असल्या कपोलकल्पित गोष्टी आपण कशा स्विकारतो?

आजही सदेह वैकुंठावर विश्वास ठेवणारी प्रचंड गर्दी आपण अनुभवतो आहे. माऊलींच्या पसायदानापेक्षा भिंत चालवल्यावर जास्त बोलतो आहे.. किर्तनकार जे जे सांगताहेत त्यावर विश्वास ठेवतोच आहे.. अशावेळी किर्तनकार, वारकऱ्यांची ही जबाबदारी आहे की, समाजातील चांगले वाईट शोधण्याची.. त्यावर बोलण्याची.. आपल्याला जो नैतिक अधिकार आहे, त्यातून वाईटावर प्रहार करण्याची.. राजकारणात आपला वापर करू देण्याची नाही..हे जरूर लक्षात असू द्या…!

Next Post

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल! रोटी येथील विद्यार्थी आत्महत्या प्रकरण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खानापूरात अभिषेक चा खून केला आणि गाठले त्यांनी रत्नागिरी.. पण कानून के भी हात लंबे होते है.. फिर गुनहगार ओंकार हो या रहीम!  

February 4, 2023

हरीण मारले तर होतो गुन्हा; पण हरीण वाचवणं हा सुद्धा ठरला त्यांचा गुन्हा! बारामतीवरून दौंडला निघालेल्या दुचाकीला हरीण आडवे गेले आणि हरणाला वाचवताना एकाचा मात्र जीव गेला..!

February 4, 2023

जो जो चीनच्या नादाला लागला.. तो तो कंगाल जाहला..! श्रीलंकेनंतर पाकिस्तानची अवस्था वाईट! एका डॉलरचा दर पोहोचला 271 रुपयांवर!

February 4, 2023
ऐका हो ऐका.. इंदापूरात पीडब्ल्यूडीच्या कामाने प्रवाशीही गहिवरला.. खातं एवढं प्रामाणिक की, रात्री स्पीड ब्रेकर उभा केला.. तिसऱ्या दिवशी त्याचापार भुगा झाला..!

ऐका हो ऐका.. इंदापूरात पीडब्ल्यूडीच्या कामाने प्रवाशीही गहिवरला.. खातं एवढं प्रामाणिक की, रात्री स्पीड ब्रेकर उभा केला.. तिसऱ्या दिवशी त्याचा
पार भुगा झाला..!

February 4, 2023

अभ्या तू फिक्स… असं लिहून त्यांनी अगोदर स्टेटस ठेवले होते.. पूर्वीच्या काळी दरोडा टाकताना सांगून टाकायचे.. आता सांगून गावागावात खून करू लागलेत, मिसरूड न फुटलेली मुलं..

February 4, 2023

टकारी समाजाचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचं मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचं आश्वासन!

February 3, 2023

पाटसला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन.!

February 3, 2023

शांतताप्रिय खानापूर गावात वीस वर्षीय युवकाचा निर्घृण खून! गावगुंडाने का केला खून? गाव चिडले!

February 3, 2023

आता राज्यात प्रत्येक शाळेत आजीआजोबा दिवस साजरा होणार.. विटीदांडूपासून आजीच्या बटव्यापर्यंतचा प्रवास होणार..नातू आजीआजोबांसाठी करणार डान्स..!

February 4, 2023

एकजूट मविआची दिसली.. महाराष्ट्रातील विचित्र राजकारणाला खतपाणी घालणाऱ्या भाजपविषयीची सुशिक्षितांच्या मतातून दिसली..!

February 3, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group