दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील मलठण येथे डोक्यात जबर मारहाण करून एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दौड पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. अमोल सुनिल लवंगरे (रा-मलठण ता. दौंड जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत दौंड पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नारायण लक्ष्मण डोईफोडे यांच्या घरी ११ डिसेंबर रोजी आरोपी अमोल सुनिल लवंगरे याने कोणत्यातरी कारणावरुन नारायण डोईफोडे ( वय ५० वर्षे) यांना कोणत्या तरी हत्याराने डोक्यात जबर मारहाण केली होती.
या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत नारायण यांच्या पत्नी हर्षदा यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास उपपोलीस निरीक्षक शहाजी गोसावी हे करीत आहेत.