चंदीगड – महान्यूज लाईव्ह
पंजाबचा शेतकरी किती चिवट हे वेगळे सांगायला नको.. केंद्र सरकारने कितीही आडकाठ्या आणल्या, तरी आठ -आठ महिने शेतकरी दिल्लीच्या सीमेवरून हटले नाहीत.. शेवटी केंद्र सरकारलाच माघार घ्यावी लागली.. एवढा धडा घेऊनही पंजाबचे पोलिस शहाणे झाले नाहीत.. फिरोजपूर जिल्ह्यातील झिरा भागातील एका दारूच्या कारखान्याबाहेर शेतकऱ्यांना हुसकावण्यासाठी लाठीमार करणाऱ्या शेकडो पोलिसांना शेतकऱ्याचा रुद्रावतार महागात पडला.. शेकडो पोलिसांना पळून जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.
हा व्हिडीओ येथे पहा..
पहले पंजाब पुलिस ने किसानों पर लाठीचार्ज किया। फिर किसानों ने पुलिस पर लाठीचार्ज किया। Ek mauka 🐍 Nu 😂😂😂😂 pic.twitter.com/tby2AyR2Bq
— Prahlad (@PrahladDalwadi) December 20, 2022
फिरोजपूर जिल्ह्यातील झिरा येथील मन्सूरवाल गावात दारू कारखान्यामुळे मोठे प्रदूषण होत असल्याने या कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तब्बल पाच महिन्यांपासून शेतकरी येथे आंदोलनाला बसून आहेत. या शेतकऱ्यांना येथून उठविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
त्याचा एक व्हिडीओ सध्या एवढा व्हायरल होतोय की विचारूच नका. येथे जमलेल्या शेतकऱ्यांवर अचानक पोलिसांनी लाठीमार सुरू केला. त्यांना काहीच कल्पना नव्हती की, शेतकरी असले तरी त्यांच्यामध्येही सहनशक्तीची मर्यादा आहे.
शेतकरी लाठ्या सोसत असतानाच एक सरदार शेतकरी पुढे आला. सुरवातीला त्यानेही काही काठ्या सोसल्या, मात्र त्याने पुढे येऊन जी सुरवात केली की, पोलिसांना पळायला जागा पुरेना अशी अवस्था झाली.
त्या सरदारने लाठी उगारली आणि संपूर्ण पोलिस ताफा मागे सरला. मग सरदारने दिसेल त्या पोलिसाला ठोकण्यास सुरवात केली. मग मात्र पोलिस पळून गेले. मात्र या घटनेनंतर अप्पर पोलिस अधिक्षक कवरदिप कौर त्या ठिकाणी पोचल्या आणि तेथील वातावरण सामान्य स्तरावर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेमध्ये पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.