इंदापूर – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात निरा डाव्या कालव्याच्या धोकादायक पूलावरून पडून मंगळवारी (ता. २०) बबन भिमा चांदणे (वय ५० वर्षे) या मजूराचा मृत्यू झाला.
तालुक्यातील शेळगाव येथील तेलओढा येथील बहुचर्चित पूलावरून पडून ही दुर्घटना घडली. हा पूल नादुरूस्त झाल्याने अनेकदा त्याच्या दुरुस्तीची स्थानिकांनी मागणी केली.
मात्र हा पूल कोणाच्या ताब्यात यावरून जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये संभ्रम आहे, त्याचा परिणाम मजूराचा जीव जाण्यात झाला आहे.