दौंड ग्रामपंचायतीवर आमदार कुल यांचे निर्विवाद वर्चस्व तर माजी आमदार रमेश थोरात यांच्या राष्ट्रवादीचा धुव्वा..! आठ पैकी केवळ एकच ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे!

दौंड : महान्यूज लाईव्ह

दौंड तालुक्यातील आठ ग्रामपंचायत पैकी पाच ग्रामपंचायतीवर भाजप आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी बाजी मारत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर माजी आमदार रमेश थोरात यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांना फक्त दापोडी ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला आहे.

दरम्यान, मतमोजणी नंतर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात विजयी उमेदवार व समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा करत आनंद साजरा केला. दौंड तालुक्यातील नांदूर, दहिटणे, देवकरवाडी, पाटेठाण, डाळिंब, बोरीबडक, दापोडी, लोणारवाडी या आठ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दिनांक २०) तहसील कार्यालयातत पार पडली.

या निवडणुकीमध्ये नांदूर, दहिटणे, देवकरवाडी, बोरीभडक, लोणारवाडी या पाच ग्रामपंचायतीवर सरपंच पदावर आमदार राहुल कुल यांचे समर्थक विजयी झाले आहेत. तर दापोडी या एकाच ग्रामपंचायतीवर माजी आमदार रमेश थोरात यांच्या समर्थकांना विजय मिळवता आला. तर पाटेठाण या ग्रामपंचायत सरपंच पदासाठी एकही उमेदवार रिंगणात उभे नसल्याने हे पद रिक्त असले तरी उर्वरित विजयी झालेल्यांमध्ये जास्त सदस्य संख्या ही आमदार राहुल कुल समर्थकांची आहे, त्यामुळे या ग्रामपंचायतीवरही आमदार कुल समर्थकांकडे सत्तेच्या चाव्या राहणार आहेत.

आमदार राहुल कुल समर्थक (भाजपा) सरपंचपदाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – देवकरवाडी – तृप्ती दिगंबर मगर (८६१), दहिटणे -आरती सचिन गायकवाड (७१६), नांदूर -युवराज बबन बोराटे ( ७६५), बोरीभडक -कविता बापू कोळपे (१०१५ ), लोणारवाडी -प्रतीक्षा निलेश हिवरकर (५६०),

माजी आमदार रमेश थोरात समर्थक (राष्ट्रवादी) विजयी – दापोडी -आबासो तुकाराम गुळमे (१००८). तसेच डाळिंब येथे अपक्ष उमेदवार बजरंग सुदाम म्हस्के यांनी ९३३ मते मिळवत कुल व थोरात समर्थक उमेदवारांचा दारुन पराभव करत काँग्रेस मध्ये नवचैतन्य आणले आहे.

दरम्यान, दौंड तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यामध्ये चार व दुसऱ्या टप्प्यांमध्ये चार ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची प्रकिया पार पडली. तसेच दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात केला होता.

Maha News Live

Recent Posts

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

24 hours ago

पेशव्यांचे सावकार, बारामतीचे विकासपुरुष – बाबुजी नाईक

उन्हाळ्याच्या बोधकथा - २ घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर तसेच काशीविश्वेश्वर मंदीर…

3 days ago