इंदापूर – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आज मतमोजणी झाली.. लढत ही भाजप व राष्ट्रवादीमध्येच झाली.. पण चर्चा रंगली ती, राष्ट्रवादीच्या एकहाती असलेल्या बेलवाडी गावाची.. त्याच हद्दीला जोडून असलेल्या थोरातवाडी, मानकरवाडीची..! या तीनही गावांनी यंदा भाजपला कौल दिला आणि गुलाल आपलाच अशा हवेत असलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना धूळ चारली..!
आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाली आणि कळाशी, माळवाडी राष्ट्रवादीकडे तर सराटी भाजपकडे गेल्याचा संदेश कार्यकर्त्यांना मिळाला आणि सगळीकडे दोन्ही पक्षांचा गुलाल उधळला गेला.. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जल्लोष करायला चांगली संधी मिळाली, मात्र तोपर्यंत तालुक्याच्या पश्चिम भागातील ज्या गावाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, त्या बेलवाडीचा निकाल हाती आला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना धक्काच बसला.. तर दुसरीकडे भाजपने जल्लोषाला सुरवात केली.
भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार हे पहिल्यांदाच या निवडणूकीत उतरले आणि ती निवडणूक त्यांनी सरपंचपदासह जिंकली. त्यांच्या पत्नी सरपंचपदी निवडून आल्या. विशेष म्हणजे समोर उद्योगपती अर्जून देसाई यांची मुलगी व छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, आता ज्यांच्या हातात गावची सत्ता होती, ते कांतिलाल जामदार यांच्या सूनबाई उभ्या होत्या.. बाहेरगावच्या साऱ्यांचा अंदाज चुकवत गावाने भाजपला कौल दिला आणि बेलवाडीने सत्ताधाऱ्यांना लोळवत सत्ता खेचून आणली.
त्यानंतर काहीच क्षणात थोरातवाडी, मानकरवाडी गावाचेही निकाल आले आणि राष्ट्रवादीला धूळ चारलेल्या या दोन्ही गावांची चर्चा तालुक्यात झाली. या तीन गावांमधील मतदान तुलनेने कमी असले तरी या गावांचा प्रभाव जिल्हा परीषदेच्या निवडणूकीत, आमदारकीच्या निवडणूकीत व छत्रपती कारखान्याच्या निवडणूकीत होत असतो. त्यामुळे आता छत्रपती कारखान्याची निवडणूक तोंडावर आहे, जिल्हा परीषदही तोंडावर आहे अशा परिस्थितीत ही तीन गावे भाजपच्या ताब्यात गेली आहेत.
इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायत च्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून खालील सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत..
१)बिजवडी- कोमल कचरे, २) गंगावळण- प्रसन्न गलांडे, ३) सराटी -आनिसा अमीर तांबोळी, ४) न्हावी- आशा दीपक डोंबाळे, ५) डिकसळ -मनीषा गवळी, ६ कुरवली- राहुल चव्हाण, ७ रेडणी- हिरा खाडे, ८) म्हसोबावाडी -राजेंद्र राऊत, ९)मानकरवाडी- शिर्के महादेव हनुमंत, १०) रणमोडवाडी- योगेश खरात, ११)बोरी- मंदा डोंबाळे, १२) कळाशी- रूपाली राजेंद्र गोलांडे, १३) पिंपरी खुर्द- शिरसोडी — राजेंद्र चोरमले,
१४) माळवाडी- मंगल बाळासाहेब व्यवहारे, १५) अजोती – सुगाव- अमित काटे, १६ हिंगणगाव- रसिका आरडे, १७) मदनवाडी -अश्विनी बंडगर, १८पडस्थळ -वैशाली पांडुरंग मारकड, १९ बेलवाडी -मयुरी शरद जामदार, २०)डाळज ३- अमित अर्जुन जाधव, २१)झगडेवाडी- अतुल गौतम झगडे, २२) लाखेवाडी -चित्रलेखा श्रीमंत ढोले, २३)डाळज नं. १-माधुरी महेश जगताप, २ ४) थोरातवाडी-साधना संतोष निकम,
२५) डाळज २-शकुंतला सुरेश जगताप, २६) जांब- समाधान गायकवाड,