दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील सात गावातील ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या. १८३११ मतदारांपैकी १४६२६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एकूण ७९.८८ टक्के मतदान झाले.
तालुक्यातील गोवेदिगर, काळंगवाडी, पांडे, किकली, बोपर्डी, कवठे, भुईंज या सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आज काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडल्या. भुईंज येथील १२ मतदान केंद्रावर ७७०४ मतदारापैंकी ५७०४ मतदारांनी मतदान केले. एकुण ७४.०४ टक्के मतदान झाले.
कवठे येथील ५ मतदान केंद्रावर ३४२१ मतदारापैंकी २७७१ मतदारांनी मतदान केले. एकुण ८१ टक्के मतदान झाले. बोपर्डी येथील ३ मतदान केंद्रावर २०७९ मतदारापैंकी १८१९ मतदारांनी मतदान केले. एकूण ८७.४९ टक्के मतदान झाले.
किकली येथील ३ मतदान केंद्रावर २०७५ मतदारापैंकी १७२६ मतदारांनी मतदाण केले. एकुण ८३.१८ टक्के मतदान झाले. पांडे येथील ३ मतदान केंद्रावर १४५८ मतदारापैंकी १२४३ मतदारांनी मतदान केले. एकुण ८५.२५ टक्के मतदान झाले.
काळंगवाडी येथील ३ मतदान केंद्रावर ८७७ मतदारापैंकी ७७३ मतदारांनी मतदान केले. ८८.१४ टक्के मतदान झाले. गोवेदिगर येथील ३ मतदान केंद्रावर ६९७ मतदारापैंकी ५९० मतदारांनी मतदान केले. एकुण ८४.६५ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान काळंगवाडी येथे ८८.१४ टक्के तर, सर्वात कमी भुईंज येथे ७४.०४ टक्के झाले.
सात गावातील १५० उमेदवारांचे राजकिय भवितव्य आज पेटीत बंद झाले असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस व प्रशासकीय यंत्रणा कार्यरत होती. पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे स्वत: गावोगावी जावून बंदोबस्ताची पाहणी करीत होते. तर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार रणजित भोसले सर्व निवडणूक यंत्रणेवर लक्ष ठेवून मार्गदर्शन करित होते.