दौंड: महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्य निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया रविवारी शांततेत पार पडली. ही माहिती दौंड तहसीलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी संजय पाटील यांनी दिली. दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील आठ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी (दिनांक १८) मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली.
८ ग्रामपंचायतीमध्ये एकूण १५ हजार ५०४ मतदारांपैकी १२ हजार ९६६ मतदारांनी आपला लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील या आठ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ८३.६३ टक्के मतदान झाले. यामध्ये नांदुर ८६.७५ % ,बोरीभडक ८३.५७%, डाळींब ८१.०९, पाटेठाण ८६.९३%, देवकरवाडी ८९.५३%, दहिटणे ८२.२९%, दापोडी ७९.९७%आणि लोणारवाडी ८५.५३% या ८ ग्रामपंचायत निवडणुकीत एकुण ८३.६३ टक्के मतदान झाले.
मतमोजणी ही दोन दिवसांनंतर म्हणजेच मंगळवारी (दि २०) दौंड येथील नवीन प्रशासकीय अर्थात तहसील कार्यालयातील दुसऱ्या इमारतीवर होणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी दिली.