दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
हिंदुस्थानात हिंदुनाच स्वत:च्या हक्कांसाठी झगडावे लागत आहे, हे आमचे दुर्दैव आहे. आम्हाला धर्मशिक्षण नसल्याने आमच्यात धर्माभिमान उरला नाही व धर्माभिमान नसलेला समाज षंढ असतो. राज्य सरकारने लव्ह जिहाद व धर्मांतरण बंदीचा कायदा करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. तर हिंदुंनी स्वत: धर्माचरण करुन त्यासाठी इतरांना प्रेरित करु शकतो असे मत हिंदु जनजागृतीच्या महिला कार्यकर्त्या भक्ती आफळे यांनी व्यक्त केले.
लव्ह जिहाद व धर्मांतरण बंदी कायद्यासाठी आज वाई तालुक्यातील हिंदु समाजाच्यावतीने हिंदु जन आक्रोश मोर्चा काढून प्रांताधिकार्यांना तसे निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या सांगता सभेत त्या बोलत होत्या.
महागणपती मंदिरापासून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात तालुक्यातील हिंदु समाजबांधव व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवती व महिलांचाही सहभाग उल्लेखनीय होता. मोर्चा गंगापुरी, दातार हाँस्पिटल, नगरपालिका, किसनवीर चौक मार्गे पोलीस स्टेशन समोर आला.
यावेळी भक्ती डाफळे म्हणाल्या, जेथे जेथे हिंदु अल्पसंख्यांक झाले, तेथून त्यांचे उच्चाटन करण्यात आले. काश्मिरी पंडितांना एका रात्रीत बेघर व्हावे लागले. ख्रिस्ती मिशनरी लोक गरिब हिंदूंना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतरण करीत आहेत. तर लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदु तरुणी बाटवल्या जात असून मुले जन्माला घालणारे यंत्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. हे रोखण्यासाठी लव्ह जिहाद व धर्मांतरण बंदी कायदा होणे गरजेचे आहे.
हिंदु एकताचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर म्हणाले, हिंदु समाज केवळ मोर्चासाठी एकत्र येतो. हा एकसंघपणा अबाधित राहिला पाहिजे. गावोगावी हिंदु जागरण वर्ग होणे गरजेचे आहे. त्यातून येणार्या पिढ्यांना धर्माचे स्वरुप समजेल. त्याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासुन करावी. घरातील महिला तरुणींना धर्माचे शिक्षण द्यावे.
यावेळी तरुणींच्या हस्ते प्रांताधिकार्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. वारकरी सांप्रदायाच्या वतीने मोर्चास मारुती महाराज चोरट यांनी पाठिंबा दिला. तसेच लव्ह जिहादचा स्वानुभव घेतलेल्या यवतीने मनोगत व्यक्त केले. मोर्चात तालुक्यातील सर्व हिंदु समाजातील प्रतिष्ठित समाजबांधवासह युवक, युवती सहभागी झाल्या होत्या. पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलिस निरिक्षक रवींद्र तेलतुंबडे व सहकार्यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.