दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील रोटी येथील इयत्ता अकरावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमनाथ बाळू वेताळ (वय १७) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
शनिवारी (दिनांक १७) रोजी हा प्रकार घडला. सोमनाथ हा वरवंड येथील विद्यालय अकरावीचे शिक्षण घेत आहे. शनिवारी सकाळी सोमनाथ हा आपल्या आईला पाटस येथे बस स्थानकावर सोडून परत घरी गेला होता. दुपारी एक ते सायंकाळी सहाच्या दरम्यान त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
या प्रकरणी त्याची आई आशाबाई बाळु वेताळ यांनी पाटस पोलीस चौकीत खबर दिली आहे. दरम्यान, या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र कथित प्रेमप्रकरणातून सोमनाथ याला मारहाण केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती अशी चर्चा आहे.