बारामती – महान्यूज लाईव्ह
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणात ५१ हजारांचे बक्षिस जाहीर करणाऱ्या सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांना न्यायालयाने काल जामीन मंजूर केला.
महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जो कुणी शाई फेलेल त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करणाऱ्या गायकवाड यांच्यासह १४ जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते.
त्यानंतर गायकवाड यांना पोलिसांनी तत्परतेने अटकही केली होती. ११ डिसेंबर रोजी हा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. पाच दिवसानंतर बारामती सत्र न्यायालयाने ऋषिकेश गायकवाड आणि अन्य 13 जणांना काल (ता.16 डिसेंबर रोजी) जामीन मंजूर केला. ऋषिकेश गायकवाड यांच्या वतीने ॲड. सचिन वाघ, ॲड. राजेंद्र काळे, ॲड. एस. एन. जगताप, अॅड. गणेश आळंदीकर, अॅड. प्रसाद खारतोडे यांनी काम पाहिले.
दरम्यान जामीन मिळाल्यानंतर ऋषीकेश गायकवाड यांनी भाजपवर टिका केली. ते म्हणाले, `भारतीय जनता पक्षाने सत्तेचा दुरुपयोग करून खोटा गुन्हा दाखल केला. परंतु महापुरुषांचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा राजीनामा न घेणारा भारतीय जनता पक्ष महापुरुषांचा किती आदर करतो यातून स्पष्ट झाले.