बारामती : महान्यूज लाईव्ह
मोरगाव येथील कु़डाची शाळा या शैक्षणिक पर्यटन केंद्राकडून पुरातत्व विषयाची माहिती देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेत प्रत्यक्ष खोदकाम कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले जाणार आहे. यातून पुरातत्वीय अवशेष असलेल्या ठिकाणी खोदकाम कसे करावे याची माहिती दिली जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही या प्रसंगी उपस्थित राहता येणार आहे.
मोरगाव येथील कऱ्हेच्या पात्रात ८ राख वर्षापुर्वी इंडोनेशिया येथे झालेल्या ज्वालामुखीतून उडालेली राख सापडली आहे. या ठिकाणालाही या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना भेट देता येणार आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेजचे पुरातत्व विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पी. डी. साबळे हे या कार्यशाळेमधील सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
रविवारी १८ डिसेंबर रोजी ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. पुणे येथील लर्नस हब या उपक्रमाचे समन्वयक आहेत.