घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
आजकाल सगळ्यांना सगळे माहिती असते. कारण हातात मोबाईल असतो, यात इंटरनेट असते. त्यामुळे कुठलीही माहिती हवी असेल तर लोक लगेच गुगल गुरुला विचारतात. अनेकदा ही माहिती घेऊन ते समोरच्यापुढे स्मार्टही बनतात. पण जर पुढे सांगत असलेल्या विषयाची माहिती जर तुम्ही गुगलवर शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर वेळीच सावधान व्हा. केवळ ही माहिती शोधण्याचा प्रयत्न केला म्हणूनसुद्धा तुम्ही संशयाच्या भोवऱ्यात येऊ शकता. मामला अगदी जेलमध्ये जाण्यापर्यंत आणि भलामोठा दंड भरण्यापर्यंत पोचू शकतो. तेव्हा व्हा सावधान.
या पाच गोष्टी कधीही इंटरनेटवर शोधू नका.
१. पायरेटेड फिल्म – चित्रपटाची अनाधिकृत कॉपी तयार करणे म्हणजे पायरेडेट करणे. ही फिल्म तयार करणे हा गुन्हा आहेच. पण त्याचबरोबर ही फिल्म पाहणे हादेखील गुन्हा आहे. अशावेळेस जर तुम्ही पायरेटेड फिल्मबाबत इंटरनेटवर शोध घेत असाल तर कायद्याच्या जाळ्यात अडकू शकता.
२. गर्भपात – गर्भपातासंदर्भात माहिती शोधल्यानेही तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता. असे करणे बेकायदेशीर आहे.
३. बॉम्ब बनविण्याची प्रोसेस – बॉम्ब कसा बनवायचा याचा शोध तुम्ही घेत असाल तर तो कोठे फोडायचा याचाही विचार तुम्ही नक्कीच केला असेल. पण केवळ गंमतीतही तुम्ही गुगलवर असा सर्च करत असाल तर केवळ तेवढ्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकू शकता. असंख्य प्रश्नांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल आणि तुमच पुढचे सगळे आयुष्य या संशयाच्या छायेत जाईल.
४. चाईल्ड पोर्न – लहान मुलांशी संबंधित लैंगिक गु्न्हे हा अतीशय गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे तुम्ही अशा संदर्भात काहीतरी तर इंटरनेटवर शोधत असाल तर वेळीच सावध व्हा. या प्रकरणात तुम्ही पॉक्सो अॅक्ट अंतर्गत ५ ते ७ वर्षासाठी आत जाऊ शकता.
५. बलात्कार अथवा संबंधित पिडीतेचे नाव ऑनलाईन टाकणे – बलात्कार किंवा अन्य संबंधित गुन्ह्यामधील पिडीतेचे नाव तिची विनाकारण बदनामी होऊ नये यासाठी कुठेही सार्वजनिक होऊ दिले जात नाही. जर कोणी असे केले तर कायद्याच्या नजरेत तो गु्न्हा ठरतो. त्यामुळे याबाबतही सावधान. एखाद्या प्रकरणातील असे नाव तसेच फोटो शोधून काढण्याचा आणि त्याचे डिटेल्ड ऑनलाईन करण्याने तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता.
इंटरनेटच्या आधारे तुम्ही केलेली कोणतीही कृती मागे एक पुरावा शोधत असते. तुम्ही कितीही हिस्ट्री डिलिट करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित साबयर तज्ञ ही हिस्ट्री शोधून काढू शकतात. त्यामुळेच इंटरनेटमुळे सगळे सोपे झाले हे खरे असले तरी जर याचा वापर काळजीपूर्वक केला नाही तर मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागू शकते.