घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
२०२२ आता संपत आलेय, मागील दोन वर्षे कोरोनाने खाऊन टाकल्यानंतर आलेले २०२२ मध्ये जग नॉर्मलवर आले होते. आता
पुढचा आठवडा संपता संपता सगळी माध्यमे २०२२ वर्षाचा आढावा घेण्यासाठी सुरुवात करतील आणि तुम्ही आम्ही ३१ डिसेंबर कसा साजरा करायचा याची तयारी करायला लागलेले असू. या सगळ्यात दरवर्षी गुगलने २०२२ मधील सर्वाधिक ट्रेंडस जाहीर केले आहे. कोठल्याही गोष्टीची माहिती मिळविण्यासाठी जगातील सर्वाधिक लोक गुगल सर्चला प्रश्न विचारत असतात. याआधारेच लोकांनी कशाकशाचा शोध घेतला याची यादी प्रसिद्ध झाली आहे.
या यादीतील सर्वाधिक शोधला गेलेला शब्द आहे wordle. याचा मराठी अर्थ शब्दकोडे. ऑनलाईन शब्दकोडी सोडविण्यात जगभरातील सर्वाधिक लोक आपला वेळ घालवतात असे यावरून दिसते.
या यादीतील दुसरा सर्च आहे तो भारताशी संबंधित आहे. भारत विरुद्ध इंग्लडची टी व्टेंटी मॅच ही ३ ते ९ जुलैला मोठ्या प्रमाणात शोधली गेली. अर्थातच याचा सर्वाधिक शोध भारतातून झाला, परंतू भारताप्रमाणेच कतार, युनायटेड अरब अमिरात, नेपाळ, ओमान आणि पाकिस्तानमधूनही हा शोध घेतला गेला.
या वर्षभरात जगात घडलेल्या घटनांचा प्रभाव या सर्च इंजिनवर अर्थातच पडतो. युक्रेनचे युद्ध आणी इंग्लंडची राणी एलिझाबेध हीचा मृत्यू या यातीलच सर्वाधित शोधल्या गेलेल्या घटना आहे. याचबरोबर पाचव्या क्रमांकावर पुन्हा एकदा भारत विरुध दक्षिण आफ्रिकेची मॅच ही शोधली गेली आहे.
६ ते १० नंबरवरच्या शोधात पुन्हा एकदा सातव्या क्रमांकावर भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मॅच आहे तर १० क्रमांकावर इंडियन प्रिमियर लीग अर्थाच आयपीएल आहे. याखेरीज सहाव्या क्रमांकावर वर्ल्ड कप आहेच.
सर्वाधिक शोधल्या गेलेल्या बातम्यांमध्ये अर्थातच पहिला नंबर युक्रेन युद्धाचा आहे, जे फेब्रुवारीत सुरु झाले आणि अजूनही संपण्याचे नाव घेत नाहीये. दुसऱ्या क्रमांकावर राणी एलिझाबेधचा मृत्यू आहे.
जगभरातील लोकांनी कोणत्या खाद्यपदार्थाचा शोध घेतला.
पनीर पसंदा ही जगभरातील लोकांनी सर्वाधिक शोधलेली डीश आहे. जगभरातील लोकांना एकदम ही भारतीय डीश कशी आवडायला लागली असा कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल. पण ही डिशचा शोध भारतीय लोकांनीच घेतलेला आहे. पण शोध घेणाऱ्या भारतीयांची संख्याच ऐवढी मोठी होती की ही डिश जगभरातील सर्वाधिक शोधली गेलेली डिश ठरली. यातही फेब्रुवारी ते मे या काळातच पनीर पसंदाचा शोध सर्वात जास्त घेतला गेला आहे.
जगभरातील लोकांनी सर्वाधिक माहिती घेतलेल्या विषयांची यादी खुप मोठी आहे. पण आपल्याला इंटरेस्ट असतो भारताशी संबंधित गोष्टीत, त्यामुळे तेवढ्याचीच माहिती येथे घेतली आहे. आता भारतीय लोकांनी सर्वाधिक कशाचा शोध घेतला ते उद्याच्या लेखात पाहू.