सोलापूर – महान्यूज लाईव्ह
अकलूजमध्ये झालेल्या एका विवाहसोहळ्याची देशभर चर्चा झाली. अंधेरीतील रहिवासी असलेल्या व आयटी कंपन्यांमध्ये चांगल्या पगारावर असलेल्या दोन जुळ्या बहिणींनी चक्क एका टॅक्सी ड्रायव्हरशी लग्न केले.
एकाचवेळी दोघींनी लग्न केल्याने या लग्नाची चर्चा झालीच, शिवाय अतुल अवताडेवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने, महिला आयोगाने दखल घेतल्यानेही त्याची चर्चा झाली. त्यातच त्याचे आधी एक लग्न झाल्याची माहिती बाहेर आल्याने तर यात भरच पडली.. आता सोलापूरच्या कोर्टानेच अदखलपात्र गुन्ह्यात तपास काय करणार असा प्रश्न केल्याने पोलिसांचाही चौकशीचा मार्ग बंद झाला आहे.
अकलूजच्या या प्रकरणात काय होणार याची सगळीकडे चर्चा असतानाच जर या प्रकरणात पिडीत तक्रारदार नसेल तर काय तपासण करणार असा सवाल कोर्टानेच विचारल्याने पोलिसांचेही हात बांधले गेले आहेत. त्यामुळे द्विभार्या प्रतिबंधक कायदा असला तरी रिंकी-पिंकीचीच तक्रार नाही, त्यामुळे अतुल अवताडे सध्या तरी खूष आहे. त्याचे यापूर्वीच लग्न झाल्याची चर्चा असून त्याच्या पहिल्या बायकोने तक्रार केली असल्याचे सांगितले जात आहे, मात्र अजून त्याबाबत पुढे काही आलेले नाही.
पोलिसांनी अतुलच्या पहिल्या बायकोने पुढे येऊन तक्रार दिली, तर त्याचा तपास करू असे सांगितले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तरी रिंकी-पिंकीसोबत अतुलचा संसार चांगला चालण्याची चिन्हे आहेत. आजारपणाच्या काळात रिंकी पिंकी व तिची आईची टॅक्सीचालक अतुल अवताडे याने काळजी घेतल्याने त्यातून प्रेमप्रकरण जुळले व रिंकी-पिंकी एकमेकींना सोडून राहूच शकत नसल्याने अतुलबरोबर दोघींनी विवाह केला आहे.